लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली पावणेतीन कोटींच्या रक्कमेची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:48 PM2018-12-09T12:48:49+5:302018-12-09T12:49:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून एकुण दोन कोटी 73 लाख 29 ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून एकुण दोन कोटी 73 लाख 29 हजार 726 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली.
राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमोद तरारे, जिल्हा न्यायाधिश आर.एस.गुप्ता, न्या.सतिष मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायादंडाधिकारी जी.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणे, फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे, दाखलपूर्व प्रकरणे, वीज, बँका यांची थकीत बिले यांची प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.
यावेळी प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी 213 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 32 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून दहा लाख 23 हजार 98 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. मोटार अपघाताची 83 प्रकरणे ठेवण्यात आली होते. पैकी 35 निकाली निघाली. त्यातून एक कोटी 71 लाख 90 हजार दंड वसुल करण्यात आला. फौजदारी गुन्ह्याची 313 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 निकाली निघाली. त्यातून 58 लाख 61 हजार 240 रुपयांची रक्कम वसुली करण्यात आली. एकुण 609 प्रकरणापैकी 149 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून दोन कोटी 40 लाख 74 हजार 338 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुलीची 2,129 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 16 निकाली निघाली. त्यातून 18 लाख 28 हजार 460 रुपयांची वसुली झाली. वीज थकबाकी वसुलीची 1,735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 24 निकाली निघाली त्यातून दोन लाख 16 हजार 361 रुपयांची वसुली झाली. पाणीपट्टी वसुलीची 1,085 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 379 निकाली निघाली. त्यातील 10 लाख, 89 हजार 467 रुपयांची वसुली झाली. बीएसएनएल व इतर किरकोळ 1,562 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 44 निकाली निघाली. त्यातून एक लाख 21 हजार 100 रुपयांची वसुली करण्यात आली. एकुण दाखलपूर्व 6,511 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 463 निकाली काढण्यात आली. त्यातून 32 लाख 55 हजार 388 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. एम.जी.परदेशी, पी.एस.पाठक, डी.एस.पाटील, पी.एन.इंद्रजीत, एम.एन.पठाण, एस.ए.कुलकर्णी, पी.डी.बागुल, दिपाली रघुवंशी यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.
जिल्हा उपनिबंधकांकडून ठराव रद्द
वाणी यांचे संचालकपद कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 613 प्रकरणे निकाली काढण्यात आले. त्यातून एकुण दोन कोटी 73 लाख 29 हजार 726 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली.
राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमोद तरारे, जिल्हा न्यायाधिश आर.एस.गुप्ता, न्या.सतिष मलिये, दिवाणी न्यायाधिश एल.डी.गायकवाड, मुख्य न्यायादंडाधिकारी जी.एच.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकअदालतीत प्रलंबीत प्रकरणे, फौजदारी, दिवाणी, मोटर अपघात दावे, दाखलपूर्व प्रकरणे, वीज, बँका यांची थकीत बिले यांची प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढण्यात आली.
यावेळी प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी 213 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 32 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून दहा लाख 23 हजार 98 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली. मोटार अपघाताची 83 प्रकरणे ठेवण्यात आली होते. पैकी 35 निकाली निघाली. त्यातून एक कोटी 71 लाख 90 हजार दंड वसुल करण्यात आला. फौजदारी गुन्ह्याची 313 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 82 निकाली निघाली. त्यातून 58 लाख 61 हजार 240 रुपयांची रक्कम वसुली करण्यात आली. एकुण 609 प्रकरणापैकी 149 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून दोन कोटी 40 लाख 74 हजार 338 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे.
दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुलीची 2,129 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 16 निकाली निघाली. त्यातून 18 लाख 28 हजार 460 रुपयांची वसुली झाली. वीज थकबाकी वसुलीची 1,735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 24 निकाली निघाली त्यातून दोन लाख 16 हजार 361 रुपयांची वसुली झाली. पाणीपट्टी वसुलीची 1,085 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 379 निकाली निघाली. त्यातील 10 लाख, 89 हजार 467 रुपयांची वसुली झाली. बीएसएनएल व इतर किरकोळ 1,562 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 44 निकाली निघाली. त्यातून एक लाख 21 हजार 100 रुपयांची वसुली करण्यात आली. एकुण दाखलपूर्व 6,511 प्रकरणे ठेवण्यात आली होती. पैकी 463 निकाली काढण्यात आली. त्यातून 32 लाख 55 हजार 388 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली.
एम.जी.परदेशी, पी.एस.पाठक, डी.एस.पाटील, पी.एन.इंद्रजीत, एम.एन.पठाण, एस.ए.कुलकर्णी, पी.डी.बागुल, दिपाली रघुवंशी यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले.