तळोद्यात ‘रेड कॉटन बग’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:49 PM2020-09-29T12:49:22+5:302020-09-29T12:49:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कोसळलेल्या हंगामी व परतीच्या पावसामुळे काळवंडलेल्या स्थितीत असलेल्या कापसाच्या सडलेल्या ...

Red cotton bug infestation at the bottom | तळोद्यात ‘रेड कॉटन बग’चा प्रादुर्भाव

तळोद्यात ‘रेड कॉटन बग’चा प्रादुर्भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : तळोदा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कोसळलेल्या हंगामी व परतीच्या पावसामुळे काळवंडलेल्या स्थितीत असलेल्या कापसाच्या सडलेल्या बोंडामध्ये अंकुर फुटले आहेत. या बोंडांवर बोडावर ‘रेड कॉटन बॅग’ कीटकांच्या प्रादुर्भाव ही झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
तळोदा तालुक्यातील काळ्या सुपीक जमिनीतून बहुतांश शेतकरी कापसाचे सरासरी हेक्टरी उत्पादन जास्त प्रमाणात काढीत असल्याने दिवसेंदिवस कापूस पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहेत. कमी कालावधीत भरघोस उत्पादन यामुळे कापसाचे उत्पादन घेण्याची चढाओढ यातून निर्माण झाली आहे़ परंतू तालुक्यात संततधार कोसळलेल्यापावसामुळे कापूसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे़ थोड्याफार प्रमाणात फळधारणा झालेला कापूस पावसात सापडल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे़ बहुतांश शेतकºयांनी उघडीप मिळाल्यावर उत्पादन खर्च तरी निघेल या आशेवर पुन्हा कोळपणी, खत टाकणे व फवारणी केली आहे. यामुळे कापसाला थोड्याफार प्रमाणात नवीन पाने, फुले आले असले तरी हंगाम आटोपता असल्याने उत्पादनाची शाश्वती नाही.
पावसामुळे कापसाची बोंडे सडणे, सरकीला अंकुर येणे तसेच बोंडावर रेड कॉटन बॅग कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत़ यामुळे येत्या काही काळात सुरू होणाºया रब्बी हंगामासाठी खर्च कोठून आणावा असा प्रश्न उपस्थित होतो आहे़ आधीच बी-बियाणे ,खत उधार उसनवारीवर काढलेल्या दुकानदारांना पैसे कसे द्यावेत अन् कुटूंबाचा खर्च कसा ओढावा या विवंचतेत शेतकरी सापडले आहेत़ तालुका कृषी विभागाने तळोदा तालुक्याच्या विविध भागात तातडीने पंचनामे करुन कृषी तज्ञ पाठवून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे़

Web Title: Red cotton bug infestation at the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.