वय वाढविल्याबाबत प्रांताधिका:यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:53 PM2017-09-27T12:53:44+5:302017-09-27T12:53:44+5:30

ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप : शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप

Regarding extension of age: | वय वाढविल्याबाबत प्रांताधिका:यांकडे तक्रार

वय वाढविल्याबाबत प्रांताधिका:यांकडे तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : खोटे दस्तावेज तयार करून ग्रामपंचायत सदस्याने कमी वय असताना जास्त वय दाखवून वृद्धापकाळ निवृत्ती योजना व         श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार तालुक्यातील मालदा ग्रामपंचायतीचे सदस्य बाबुलाल बोंडा पवार यांच्या विरूद्ध प्रांताधिका:यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 
तळोदा येथील प्रांताधिका:यांना मालदा येथील बोखा दामू ठाकरे यांच्यासह ग्रामस्थांनी तक्रारीचे  निवेदन दिले असून, त्यात म्हटले         आहे की, तालुक्यातील मालदा ग्रामपंचायतीचे सदस्य बाबुलाल  बोंडा पावरा यांचे वय 55  असून, त्यांनी अधिक वय दाखवून खोटी कागदपत्र व दस्तावेज तयार करून खोटी माहिती देवून इंदिर गांधी   राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावण बाळ या दोन योजनांचा लाभ घेत आहेत. ते स्वत: ग्रामपंचायत सदस्य असून, शासनाची दिशाभूल करून   शासकीय योजनांचा लाभ घेत आहे.
65 वर्षावरील वयोवृद्ध व दारिद्रय़रेषेखालील व्यक्तींसाठी ही योजना असतानाही खोटे कादगपत्र व दस्तावेज सादर करून शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या विरोधात  शासनाची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवित असल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रांताधिका:यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
 

Web Title: Regarding extension of age:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.