दबाव व मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याची राजपत्रीत अधिका:यांची कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:06 PM2018-06-28T13:06:10+5:302018-06-28T13:06:28+5:30

Regarding the gazetted officials that pressure and harassment have to be faced | दबाव व मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याची राजपत्रीत अधिका:यांची कैफियत

दबाव व मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याची राजपत्रीत अधिका:यांची कैफियत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासकीय काम करतांना दबाव येतो, प्रसंगी मारहाणीलाही सामोरे जावे लागते अशा वेळी अधिका:यांच्या पाठीशी महासंघाने खंबीरपणे उभे राहावे अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघाच्या बैठकीत व्यक्त केली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, मुख्य सल्लागार ग.दी.कुलथे, उपाध्यक्ष बाळासाहेब घोरपडे, सरचिटणीस प्रकाश चौधरी, जनसंवाद सचिव अप्पा वानखेडकर, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी उपस्थित होते.
दिलीप जगदाळे म्हणाले, जिल्ह्यात पगारावर भागवा या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमांमुळे अधिका:यांचा आत्मविश्वास वाढतो. दुर्गम भागात काम करणा:या कर्मचा:यांना नियमाने तीन वर्षानंतर एच्छिक ठिकाणी बदली मिळावी परंतु अनेकांवर अन्याय होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विनोद देसाई यांनी सांगितले, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महासंघातर्फे पाठपुरावा सुरू आहे. पाच दिवसांचा आठवडा, अधिका:यांच्या पाल्यांना अनुकंपा सुविधा, महिलांच्या बाल संगोपन रजा आदी प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रय} सुरू आहेत. शासनही महासंघाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक विचार करेल असेही त्यांनी सांगितले. 
ग.दी.कुलथे यांनी सांगितले, महासंघाच्या कार्याची दखल घेवून राज्य शासनाने महासंघास मुंबईत अवघ्या एक रुपये दराने भुखंड उपलब्ध करून देत दहा कोटी निधी कल्याण केंद्रासाठी दिल्याचे सांगितले. यावेळी जनसंवाद सचिव अप्पा वानखेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
जिल्हा राजपत्रीत अधिकारी संघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, कार्याध्यक्षपदी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे, कोषाध्यक्ष उपकोषागार अधिकारी प्रकाश बनकर, कायम सदस्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, जि.प.चे लेखा व वित्त अधिकारी, सरचिटणीस यांची निवड करण्यात आली. 
दुर्गा महिला मंचाच्या अध्यक्षापदी कोषागार अधिकारी वैशाली जगताप, उपाध्यक्ष जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी, सचिव जि.प.लेखा व वित्त अधिकारी शबाना शाह, सल्लागार उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, संघटक कांचन धोत्रे, रुपाली पुंड यांची निवड करण्यात आली. 
 

Web Title: Regarding the gazetted officials that pressure and harassment have to be faced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.