सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतक:यांच्या माथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:14 PM2018-12-07T12:14:34+5:302018-12-07T12:14:39+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजार ...

Regarding the Honor Plan, the farmer still lends to the debt: on the top | सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतक:यांच्या माथ्यावर

सन्मान योजनेचे पैसे खात्यावर तरीही कर्ज शेतक:यांच्या माथ्यावर

Next

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत अर्ज करणा:या जिल्ह्यातील 47 हजार 590 पैकी 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत़ यातील काहींच्या खात्यावर कजर्मुक्तीचे पैसे वर्ग झाले असले तरी अनेकांच्या खाती दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असल्याने त्यांची ‘माफी’ रखडली आह़े विशेष म्हणजे योजनेची मुदत संपण्याचा अवधी हा 31 डिसेंबर 2018 र्पयत असल्याने उर्वरित शेतक:यांचे काय असा प्रश्न आह़े 
मार्च 2017 पासून राज्यशासनाने शेतक:यांच्या कजर्माफीची योजना आणली होती़ यांतर्गत बँकांकडून घेतलेल्या पीककर्जापैकी दीड लाख रुपये माफ करण्यात आले होत़े यासाठी शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन दिले होत़े या ऑनलाईन अर्जानंतर शासनाकडून देण्यात येणा:या याद्यांनुसार बँकांकडे थकीत असलेले दीड लाखांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरु झाली़ बँकेत दीड लाखार्पयत किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतक:यांच्या याद्यांचा पहिल्या टप्प्यात निपटारा करण्यात आला होता़ सुरुवातीला वेग पकडणारी ही सन्मान योजना गेल्या वर्षभरापासून रडखडत सुरु होती़ 
जिल्ह्यातील 9 राष्ट्रीयकृत बँका, 1 खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 27 हजार 194 खातेदार शेतक:यांसाठी शासनाकडून 107 कोटी 11 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यास मंजूरी देण्यात आली होती़ गेल्या वर्षभरात या 27 हजार शेतक:यांपैकी केवळ 23 हजार 915 शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत़ उर्वरित 3 हजार 279 शेतक:यांच्या कजर्माफीची प्रक्रिया ही तांत्रिक अडचणींमुळे रखडली आह़े येत्या काळात त्यांनाही कजर्माफी देण्यात येणार आह़े 
परंतू उर्वरित 19 हजार 676 अजर्दार शेतक:यांच्या कजर्माफीबद्दल कारवाई होत नसल्याने त्यांच्या बँकांमध्ये चकरा सुरुच आहेत़ बहुतांश शेतक:यांच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू त्यांचे पीककर्ज हे दीड लाखांपेक्षा अधिक आह़े यंदा दुष्काळामुळे संकटात असलेल्या शेतक:यांची आर्थिक घडी विस्कटली आह़े त्यात बँकेत पैसे भरण्यासाठी पुन्हा कजर्बाजारी व्हावे लागणार असल्याने शेतक:यांनी पाठपुरावा सोडून दिला आह़े 
31 डिसेंबर्पयत या योजनेस अंतिम मुदत असल्याची माहिती आह़े यानंतर शासनाकडून या योजनेस साधारण तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे संकेत आहेत़ त्यानंतर मात्र योजना बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े 
 

Web Title: Regarding the Honor Plan, the farmer still lends to the debt: on the top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.