क्षेत्रीय अधिका:यांची मतदान केंद्रावर पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:10 PM2019-10-03T12:10:27+5:302019-10-03T12:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : क्षेत्रीय अधिका:यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट द्यावी आणि तेथील किमान आवश्यक सुविधांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : क्षेत्रीय अधिका:यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट द्यावी आणि तेथील किमान आवश्यक सुविधांची माहिती घ्यावी. तसेच त्रुटी आढळल्यास तात्काळ आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
येथील एस.ए. मिशन हायस्कूलमध्ये नंदुरबार मतदारसंघात मतदानासाठी नियुक्त मतदान कर्मचा:यांच्या प्रशिक्षणप्रसंगी डॉ.भारुड बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे, गटविकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रीया समजावून घेतल्यास प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी अडचणी येणार नाहीत. शासकीय कर्मचारी प्रचारात सहभागी झाल्यास आणि निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान प्रक्रीयेतील बारकावे समजावून घ्यावे व प्रात्यक्षिकाकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिका:यांनी तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध कक्षांना भेट देऊन माहिती घेतली. प्रशिक्षणाच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन योग्यरितीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
तहसील कार्यालयात येणा:या नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी माहिती देण्यात यावी. भरारी पथकांना शहरातील प्रत्येक भागात भेट देण्याच्या सूचना द्याव्यात व आचारसंहिताभंगाची घटना आढळल्यास त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. डॉ.भारुड यांनी वखार महामंडळाच्या गोदाम परिसरातील नियोजित मतमोजणी स्थळाला भेट दिली व त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. एस.ए. मिशन हायस्कूल येथे दोन सत्रात झालेल्या या प्रशिक्षणाला सुमारे 1400 कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदान प्रक्रीया याबाबत माहिती देण्यात आली. मतदान कर्मचा:यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काम करावे आणि मतदान यंत्राबाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून करून घ्यावी, असे स्वाती थवील यांनी सांगितले. तहसीलदार थोरात यांनीही मार्गदर्शन केले.
निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा:यांनी प्रत्येक प्रशिक्षणाला उपस्थित राहणे आवश्यक आहे. निवडणूक डय़ुटी रद्द करण्यासाठी अनेक कारणे दिली जातात. परंतु राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने या कामासाठी प्राधान्य द्यावे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी दिल्या. कारवाई करण्याची वेळ येवू देऊ नये असेही त्यांनी सांगितले.