16 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:38 PM2019-10-07T12:38:29+5:302019-10-07T12:38:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या तिमाही नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. कामगारांमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या तिमाही नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. कामगारांमध्ये काही अंशी जनजागृती झाल्यामुळे मोहिमेच्या या तीन महिन्यातच आठ हजार 500 कामगारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे आजर्पयत 16 हजार 287 कामगारांची नोंदणी झाली असून त्यांना मंडळामार्फत विविध योजना दिल्या जाणार आहे.
बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यात तीन महिन्यांची विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी विविध बांधकाम व्यावसायिकांना सूचना देण्यात आली होती. तर बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांचे खाते उघडून त्यांची नोंदणी करण्यावर भर दिला गेला होता.
बांधकाम व्यावसायिकांकडे काम करणारे मजूर, प्लंबर, लिफ्ट मेंटेनन्स, टाइल्स फिटिंग, ब्रिकवर्क, पीओपी, इलेक्ट्रिकल आदी छोटी-मोठी कामे करणा:या असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली. त्यानुसार आजर्पयत 16 हजार 287 कामगारांची नोंदणी करण्यात आली. नोंदणीनंतर मंडळांच्या योजनांचे लाभ, तसेच अनुदान कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यासाठी कामगारांच्या बँक खात्याचा क्रमांक, आधार कार्ड असणे अपेक्षित होते. मात्र, अनेक कामगारांकडे बँक खाते, आधार कार्ड नव्हते. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेस काहीशी अडचण आलीे, या अडचणीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनाही या कल्याणकारी मंडळामार्फत करण्यात आल्या आहे. याशिवाय कायद्यानुसार, कामगारांसाठी सुरक्षा विषयक पाहणीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
नोंदणी केलेल्या कामगारांना अवजारे खरेदीसाठी आणि सुरक्षेसाठी अर्थसाह्य केले जाते. त्याअंतर्गत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप केले जाणार आहे. त्यात अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना शैक्षणिक अर्थसाह्य, तर अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत कामगारांना अर्थसाह्य केले जाते. या योजनेबाबत जनजागृतीसाठी ठिकठिकाणी प्रचार करण्यात आला. त्यामुळे नोंदणी मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला असून तीनच महिन्यात आठ हजार 500 कामगारांची नोंदणी झाली. त्यामुळे आजर्पयत नोंदणी झालेल्या एकुण 16 हजार 287 जणांना लाभ दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा संच मोफत वाटप केले जाणार आहे. त्यात बुट, हेल्मेट, ग्लोव्हज, हार्नेस, लोखंडी पेटी, मच्छरदाणी, स्टीलचा डबा, बॅटरी आदी सांहित्यांचा समावेश आहे. त्यामुळे कामगार सुरक्षीत राहणार आहे.