संशयित बालगुन्हेगारांचा जामीन रद्द करीत पुन्हा सुधारगृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:59 PM2017-08-06T12:59:47+5:302017-08-06T13:03:31+5:30
विद्यार्थी खून प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 6- शाळकरी विद्याथ्र्याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयीत दोन्ही मुलांना बालसुधारगृहात दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. संशयीतांना लागलीच जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे जनमानसात तीव्र भावना निर्माण झाल्या होत्या. त्या विरोधात आंदोलने देखील झाली होती.
नंदुरबारातील कोकणीहिल भागात राहणा:या राज ठाकरे या विद्यार्थाचा 7 जुलै रोजी त्याच्याच परिसरात राहणा:या दोन अल्पवयीन मुलांनी पैशांसाठी खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन्ही संशयीतांना 24 तासात अटक करून गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु संशयीत मुलांना बाल न्यायालयात उभे केले असता त्यांना लागलीच जामीन मंजुर करण्यात आला होता. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याविरोधात विविध संघटनांतर्फे आंदोलनही करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाकडून जामीन रद्द होण्याकरीता जिल्हा सत्र न्यायालयात अपील करण्यात आले होते.
न्या.अभय वाघवसे यांच्या न्यायालयात त्यावर कामकाज चालले. जिल्हा सरकारी वकिल नीलेश देसाई, सहायक संचालक तथा सरकारी अभियोक्ता बिपीन शिंगाडा यांनी बाजू मांडली. न्या.वाघवसे यांनी दोन्ही संशयीत मुलांनाना बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे गिरीश पाटील, दीपक बुधवंत, नितीन चव्हाण यांनी त्यासाठी विशेष प्रय} केले.