गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांचे निर्बंध शिथिल करा : भाजप : आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:33 AM2021-09-18T04:33:09+5:302021-09-18T04:33:09+5:30
श्री गणपतीमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याला, सामूहिक आरती-पूजनाला, मिरवणुकीला मात्र बंदी घातली जात आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचा भाजपतर्फे ...
श्री गणपतीमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याला, सामूहिक आरती-पूजनाला, मिरवणुकीला मात्र बंदी घातली जात आहे. राज्य सरकारच्या या धोरणाचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, गणपतीच्या सामूहिक पूजनाला हिंदू समाजात धर्मशास्त्रीय महत्त्व आहे. सामूहिक आरती आणि पूजनाची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. महाविकास आघाडी सरकारने तो एकोपा तोडणारे आणि श्रद्धांवर आघात करणारे आदेश लागू केले आहेत.
नंदुरबारातील मानाचा दादा व बाबा गणपतींची दीडशे वर्षांची परंपरा खंडित केली गेली, कार्यकर्ते मोजक्या संख्येने सॅनिटायझेशन व अंतर राखण्याचे नियम पाळायला तयार असतानाही तापी काठावर जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला, शहाद्यात गणेश मंडळांचे वाजंत्री साहित्य जप्त करीत अन्याय केला गेला. कोरोना प्रसाराचा आणि विषाणू संक्रमणाचा
सर्वाधिक धोका असतानाही गर्दी करणारे आणि वाहतुकीशी संबंधित असलेले सर्व प्रकारचे काळे धंदे राजरोस चालू आहेत. कोरोना प्रसाराचा आणि विषाणू
संक्रमणाचा फैलाव त्या माध्यमातून होत असल्याचे शासनाला जाणवत नाही आणि त्याला खरोखरचा आळा घातला जात नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आघाडी सरकारने गृहखात्याचा गैरवापर करून गणेश विसर्जनासंदर्भात काढलेले परिपत्रक रद्द न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.