गाळमुक्त धरण योजनेचा अमोनी येथून शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:48 PM2018-05-21T12:48:42+5:302018-05-21T12:48:42+5:30
दुष्काळमुक्तीसाठी उपक्रमात सहभागाचे आवाहन
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 21 : गाळमुक्त धरण अथवा तलाव योजनेंतर्गत तालुक्यातील अमोनी येथील तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ रविवारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी जास्तीत जास्त लोकांनी दुष्काळ मुक्तीसाठी अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख अतिथींनी केले.
संपूर्ण दुष्काळ मुक्तीसाठी राज्य शासनाने यंदापासून जलयुक्त धरण व तलाव ही योजना हाती घेतली आहे. या योजना शासनाच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी या विभागाला निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील पाच गावांचा या योजनेत समावेश कर ण्यात आला आहे. त्यात अमोनी, पाडळपूर, गडीकोठडा, तळवे व बोरद या गावांचा समावेश आहे. त्यापैकी अमोनी येथील गावाजवळील तलावाचा गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.जी. ठाकरे, सरपंच चंदन पाडवी, जनसेवक योगेश पाटील, उपसरपंच दिलीप पावरा, रेवानगरचे उपसरपंच दाज्या पावरा, अनुलोम उपविभाग प्रमुख कल्पेश पाडवी, तलाठी डी.बी. हाडे, ग्रामसेवक राजेंद्र पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अमादार पाडवी व जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संपूर्ण दुष्काळ मुक्ती व पाणी टंचाईवर कायम मातस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने यंदापासून ही योजना हाती घेतली आहे. त्यामुळे या योजनेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रय} करण्याचे आवाहन केले. दरम्यान आमदार उदेसिंग पाडवी यांनी लोकसहभागातून या कामासाठी 50 हजार रुपये मदत देण्याचे आश्वासनदेखील दिले. स्वत: त्यांनी दहा हजाराची मदत देखील लगेच केली. गावातील तलाव व धरणात मोठय़ा प्रमाणात साचलेला गाळ आता काढला जाणार असल्यामुळे गावक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील वर्षी या योजनेत जास्तीत जास्त गावे प्रशासनाने समाविष्ट करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.