नंदुरबार जिल्ह्यातील उपसा योजना दुरुस्तीची कामे मे अखेर पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:48 PM2018-01-19T12:48:37+5:302018-01-19T12:48:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कहाटूळ : उपसा योजनांच्या दुरूस्तीची कामे मे 2018 अखेर पूर्ण करण्याचे आदेश तापी महामंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद मोरे यांनी सातपुडा कारखान्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिले.
अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. सातपुडा कारखाना पुरस्कृत 22 उपसा सिंचन योजनांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नाशिक विभागाचे यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी यांत्रिकी विभाग व विद्युत विभागाची संयुक्त बैठक घ्यावी म्हणून सातपुडा कारखान्यातर्फे दीपक पाटील यांनी ुविनंती केली होती. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय पाटील, कार्यकारी अभियंता पाचवीकर, उपअभियंता श्रीकांत अनेकर, अरूण कु:हाडे, विभागीय अभियंता भरत भारते, शाखा अभियंता गायकवाड, सातपुडा कारखान्याचे चेअरमन व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, संचालक, किलरेस्कर कंपनीचे संतोष जोशी, संजीव काळभोर, लक्ष्मीकांत सेनापती, मुकेश पवार, अशोक पाटील, अनंत वर्तक उपस्थित होते.
अधीक्षक अभियंता मोरे म्हणाले की, 30 वर्षापासून या उपसा योजना बंद आहेत म्हणून ज्ॉकवेल भागात पावसाळ्याच्या पाण्यामुळे तापी नदीच्या किना:यावरील मातीचे काम जास्त करावे लागणार आहे. उर्वरित मॅकेनिकल व इलेक्ट्रीकल कामे मे 2018 अखेर पूर्ण होऊ शकतात. म्हणून सर्व ठेकेदार व संबंधित अधिका:यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन करून त्यांनी संपूर्ण योजनांचा आढावा समजून घेतला. त्यात काही त्रुटी असतील त्यापूर्ण करण्याकामी आपले कायम सहकार्य राहील.
दीपक पाटील यांनी या योजना दुरूती प्रस्तावाच्या कामास कसे अडथळे येत गेले व त्यातून कसा मार्ग काढत या स्थितीर्पयत आपण पोहोचलो आहोत याबाबत माहिती दिली. त्यांनी सर्व अधिकारी व ठेकेदार यांना विनंती केली की, पी.के. अण्णा पाटील यांनी खूप मेहनतीने या योजना तयार करून शेतक:यांच्या शेतात पाणी दिले. आपणही आपल्या परीने या योजनांना लवकरात लवकर सुरू करण्याकामी मदत करावी, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात पी.आर. पाटील यांनी योजनांबाबतची माहिती दिली. या कामी जी मदत लागेल ती सातपुडा कारखाना करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले.