‘तूर’ उत्पादन वाढीमुळे शेतक:यांना दिलासा
By admin | Published: March 29, 2017 03:40 PM2017-03-29T15:40:28+5:302017-03-29T15:40:28+5:30
जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झालेल्या ‘तुरी’ची हेक्टरी उत्पादकता वाढल्याने शेतक:यांना आर्थिक दिलासा मिळाला आह़े
Next
शासनाच्या खरेदी केंद्राला प्रतिसाद : नंदुरबार हेक्टरी 650 किलो उत्पादन
भूषण रामराजे
नंदुरबार, दि.29- जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झालेल्या ‘तुरी’ची हेक्टरी उत्पादकता वाढल्याने शेतक:यांना आर्थिक दिलासा मिळाला आह़े शासनाकडून दिल्या जाणा:या पाच हजार रुपये भावामुळे शेतक:यांनी समाधान व्यक्त करून मालही नाफेडकडे सोपवला आह़े
गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात खालावलेल्या पीक उत्पादनाच्या आकडय़ांमध्ये यंदा समाधानकारक बदल झाले आहेत़ गेल्या वर्षात पजर्न्यमान चांगले राहिल्याने पिकांच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली होती़ यात तूर पिकावर शेतक:यांनी मेहेरनजर ठेवत पेरणीक्षेत्र वाढवले होत़े, परिणामी जिल्ह्यात 110 टक्के तूर पेरणी झाली होती़ या तुरीचे उत्पादन गेल्या काही दिवसांपूर्वी निघून गेले आह़े या उत्पादनाला उठाव मिळत गेल्याने शेतक:यांना आधार मिळाला आह़े जिल्ह्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील 60 टक्के तूर विक्री करण्यात आली आह़े
जिल्ह्यात यंदा 16 हजार 809 हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापैकी 17 हजार 925 हेक्टर क्षेत्रात तूर पेरणी झाली होती़ सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा एक हजार हेक्टर जादा पेरा यंदा झाल्याने उत्पादनवाढीचे संकेत होत़े हे संकेत खरे ठरल्याचे चित्र आह़े जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांत पेरणी करण्यात आलेल्या तुरीचे हेक्टरी उत्पादन 641़4 किलोग्रॅम एवढे होत़े कडधान्य पिकांच्या उत्पादकतेचा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षातील सर्वोच्च आकडा असल्याचे सांगण्यात येत आह़े गेल्या वर्षात 400 किलोग्रॅम हेक्टरी उत्पादन तूरचे काढल्याची आकडेवारी होती़
जिल्ह्यात सर्वाधिक तुरीचे उत्पादन घेणा:या नवापूर तालुक्यात यंदा 5 हजार 05 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 4 हजार 808 हेक्टर पेरा झाला होता़ तर याउलट नंदुरबार तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र 2 हजार 375 हेक्टर असतानाही 4 हजार 160 हेक्टर क्षेत्रात तूर पेरणी झाली होती़ शहादा तालुक्यात 2 हजार 907 पैकी 3 हजार 754, अक्कलकुवा तालुक्यात 3 हजार 910 पैकी 3 हजार 653, तळोदा तालुक्यात 1 हजार 204 पैकी एक हजार 675 तर धडगाव तालुक्यात एक हजार 775 हेक्टरपैकी 475 हेक्टर क्षेत्रात तूर पेरणी करण्यात आली होती़