ग्रामपंचायतमार्फत हायमास्ट लॅम्प दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:22+5:302021-01-14T04:26:22+5:30
ग्रामीण भागात एलईडी पथदिवे लावल्यास वीज देयकात घसरण होऊन नागरिकांना सोयीचे ठरत होते. तसेच शहादा ते खेतिया रस्त्यांच्या रुंदीकरणाचे ...
ग्रामीण भागात एलईडी पथदिवे लावल्यास वीज देयकात घसरण होऊन नागरिकांना सोयीचे ठरत होते. तसेच शहादा ते खेतिया रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून ब्राह्मणपुरी गावामधील हायमास्ट लॅम्प बंद झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. एलईडी पथदिव्यांसह हायमास्ट लॅम्प लावण्यासाठी इलेक्ट्रिकल कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीकडे देखभाल दुरुस्तीदेखील सोपविण्यात येते. परंतु मागील काही महिन्यांपासून कंपन्यांकडून नादुरुस्त पथदिव्यांसह हायमास्ट लॅम्पची दुरुस्ती केली जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांना रात्र-अपरात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे चोऱ्यांमध्येदेखील वाढ झाल्याचे चित्र आहे. याबाबत ‘लोकमत’ने दुरुस्तीबाबत वृत्त प्रकाशित केली होती. त्याची दखल संबंधित ग्रामपंचायतने घेत हायमास्ट लॅम्प दुरुस्ती करून सुरू करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.