शेवाळी-नेत्रंग महामार्गाची येत्या आठवडय़ात दुरुस्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 03:02 PM2019-11-30T15:02:11+5:302019-11-30T15:02:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा, अक्कलकुवा आणि पुढे गुजरात हद्दीर्पयतच्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना येत्या आठवडय़ात दिलासा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा, अक्कलकुवा आणि पुढे गुजरात हद्दीर्पयतच्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांना येत्या आठवडय़ात दिलासा मिळण्याची शक्यता आह़े सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरण विभागाने सुमारे 40 किलोमीटर अंतरासाठी ठेकेदार नियुक्त केल्याची हा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत़
दरम्यान शेवाळी ते नेत्रंग या 754 बी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या चार वर्षापासून रखडले आह़े राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित असलेल्या या रस्त्याचे हस्तांतरण काही दिवसांपूर्वी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील महामार्ग प्राधिकरणकडे वर्गीकृत करण्यात आले होत़े यातून केंद्र सरकारने या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामालाही मंजूरी दिलेली नसल्याने गत चार वर्षात रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आह़े मार्गावर तळोदा, अक्कलकुवा ते थेट गव्हाळीर्पयत पडलेले जीवघेणे खड्डे अपघात घडवून आणत आहेत़ महामार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता़ यातून सार्वजनिक बांधकाम विभागाने धुळे येथील संबधित महामार्ग प्राधिकरणला माहिती दिल्यानंतर रस्ता दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करुन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आह़े या ठेकेदाराला येत्या आठवडय़ात कार्यरंभ आदेश मिळण्याची शक्यता असून सुमारे 40 किलोमीटर अंतरात खडी, डबर आणि डांबर टाकून खड्डे बुजवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े
तळोदा ते गव्हाळी अशा 40 किलोमीटर अंतरात हे काम केले जाणार आह़े तातडीने होणारे हे दुरुस्तीचे काम नेमके किती दिवस टिकेल, याची कोणतीही शाश्वती मात्र देण्यात आलेली नाही़ महामार्गाचा मूळ चौपदरीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून असून त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आह़े
साक्री तालुक्यातील शेवाळी ते गुजरात राज्यातील नेत्रंग या दरम्यानच्या या ‘शॉर्टकर्ट’ रस्त्याची 753 बी अशी निर्मिती करण्यात आल्यानंतर त्याचे चौपदरीकरण होणार असे सातत्याने सांगितले जात होत़े परंतू हा रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करुन चौपदरीकरणाचा प्रस्ताव देण्याचे सांगण्यात आल़े गेल्या चार वर्षात या प्रस्तावाचा एकही कागद मंजूर झालेला नाही़ याबाबत कारवाई कधी होणार याची माहिती नसून
पाठपुरावाच सुरु आह़े
साक्री तालुक्यातून नंदुरबार जिल्ह्यात आणि मग गुजरात मध्ये जाणारा हा महामार्ग सोयीचा असल्याने येथून वाहनांची वर्दळ वाढली होती़ यातून अक्कलकुवा तालुक्यात रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था आह़े नॅशनल हायवेकडून रस्ता पीडब्ल्यूडीकडे वर्ग झाल्यानंतर विस्तारीकरणाची कोणतीही प्रक्रिया न झाल्याने हा रस्ता संबधित विभागाकडे केवळ देखभाल दुरुस्तीसाठी आह़े परंतू त्यासाठी निधीच नसल्याने खड्डे बुजवण्याची कारवाई झाली नव्हती़ विशेष म्हणजे सर्वाधिक अंतर नंदुरबार जिल्ह्यातून जाणा:या या महामार्गाचे कामकाज धुळे येथील बांधकाम विभागातून चालवले जात असल्याने दुरुस्ती रखडल्याचे बोलले जात आह़े