विद्यार्थ्याने बनवली बसस्थानकाची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:24 PM2020-07-19T12:24:55+5:302020-07-19T12:25:01+5:30

सुनील कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सुटीचा ...

A replica of the bus stand made by the student | विद्यार्थ्याने बनवली बसस्थानकाची प्रतिकृती

विद्यार्थ्याने बनवली बसस्थानकाची प्रतिकृती

googlenewsNext

सुनील कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टे : कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सुटीचा आनंद लुटला. मात्र नंदुरबार येथील के.आर. पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात सहावीच्या वर्गा शिकणाऱ्या प्रथम प्रशांत गुजराथी या विद्यार्थ्याने घरीच नंदुरबार येथील बसस्थानकाची हुबेहूब प्रतिकृती साकारली. प्रथमच्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे.
नंदुरबार शहरातील गांधीनगर भागात राहणाºया प्रथम गुजराथी या विद्यार्थ्यास शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा छंद आहे. कोरोना लॉकडाऊन काळात घरीच असल्यामुळे विविध उपक्रम राबविण्याचा मानस प्रथमने आई-वडिलांजवळ व्यक्त केला. वडील प्रशांत गुजराथी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारात वाहतूक नियंत्रक असल्यामुळे प्रथमने नंदुरबार बसस्थानकाची प्रतिकृती बनविण्याचा संकल्प केला. यासाठी वस्तूंची जुळवाजुळव करण्यात आली. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साहित्य बनविण्यासाठी तब्बल एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. प्रथम गुजराती याने सुंदर आणि रेखीव पद्धतीने राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराची प्रतिकृती तयार केली. यात नंदुरबार बसस्थानकावरील फलांटांप्रमाणे चौकशी कक्ष, प्रवासी बैठक व्यवस्था, फलक, पंखे, खांब, विविध टाकाऊ वस्तूपासून बनविले. याशिवाय फलाटावर परिवर्तन, विठाई, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या विविध प्रकारच्या एसटी बसेसच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस नंदुरबार बसस्थानकावरील विद्युत रोषणाईकरिता तंतोतंत शोभून दिसणारे एलईडी लाईट्स बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालतात. याचबरोबर सध्या लॉकडाऊनमुळे बसस्थानकावर प्रवासी नसल्याने बाकेदेखील रिकामी दिसून येतात. प्रथम यास वडील प्रशांत गुजराथी, आई तृप्ती गुजराथी, आजी कपिला सुरेश गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भविष्यात वैज्ञानिक किंवा अभियंता होण्याची इच्छा प्रथम गुजराथी याने व्यक्त केली.

Web Title: A replica of the bus stand made by the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.