डायलेसीस तंत्रज्ञाअभावी रुग्णसेवेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:17 PM2018-03-23T12:17:10+5:302018-03-23T16:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत आह़े महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किडणीचा आजार जडलेल्या रुग्णांना यामाध्यमातून विनामुल्य उपचार करण्यात येत असतात़ परंतु डायलिसीस टेकिAशियनअभावी रुग्णसेवेवर परिणाम होत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ दोन टेकिAशियनच्या माध्यमातून गाडा चालविण्यात येत आह़े
केंद्र शासनातर्फे किडणीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी राष्ट्रीय डायलिसीस कार्यक्रम राबविण्यात येत असतो़ महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंर्गत रुग्णाला डायलिसीससाठी एक रुपयाही न भरता पूर्णपणे मोफत उपचार घेणे शक्य होत असत़े त्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील रुग्णांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे यातून स्पष्ट होत़े
विशेषत नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसीससाठी केवळ दोन टेकिAशियन असूनही नोव्हेंबर 2013 ते फेब्रुवारी 2018 र्पयत 7 हजार 870 डायलिसीस करण्यात आले आह़े सामान्य रुग्णालयात डायलिसीसची एकूण 5 मशिन्स् आहेत़ त्यामुळे त्यांना चालविण्यासही किमान पाच कर्मचा:यांची आवश्यकता आह़े परंतु केवळ दोन टेकिAशियनव्दारे या पाचही मशिन ऑपरेट करण्यात येतात़ रुग्णसेवा करीत असताना संबंधित कर्मचा:यांनाही प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आह़े
डायलिसीससाठी रुग्णांना आठवडय़ातून दोन वेळा रुग्णालयात यावे लागत असत़े तसेच एका रुग्णांला डायलिसीससाठी किमान चार तासांचा अवधी लागत असतो़ ही उपचार पध्दती घेत असताना ब:यापैकी वेळ लागतो़ आजमितीस 24 रुग्ण डायलिसीससाठी येत आहेत़ डायलिसीसची मशिन आहे, परंतु ते ऑपरेट करण्यासाठी पुरेस मनुष्यबळ नसल्याने बहुतेकवेळा रुग्णांना उपचार घेण्यासाठी ‘वेटींग’वरही रहावे लागत असत़े त्यामुळे बहुतेक वेळा रुग्णांनाही तात्कळत रहावे लागत असत़े शक्यतो रुग्णालयातील दोन्हीही टेकिAशियन जमेल त्या प्रकारे सर्व रुग्णांवर उपचार करता येईल या पध्दतीनेच काम करीत असतात़ परंतु तरीही मनुष्यबळाअभावी रुग्णसेवेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े
जिल्ह्यात बहुतेक भाग हा दुर्गम क्षेत्रात मोडला जात असतो़ त्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत़ खाजगी दवाखाना परवडणारा नसल्याने साहजिक रुग्णांचा ओढा हा शासकीय रुग्णांलयांमध्येच वाढतो़ परंतु शासकीय रुग्णालयांमध्येही मनुष्यबळ कमी असल्याने याचा थेट फटका रुग्णसेवेवर बसत आह़े शासनाने किमान दुर्गम व अतीदुर्गम क्षेत्रात मोडल्या जाणा:या ठिकाणी तरी आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करतात़