दुर्गम भागात वनभाज्या तरारल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:14 AM2017-09-04T11:14:58+5:302017-09-04T11:14:58+5:30

आवक : रस्त्यांवरही होत आहे भाजीविक्री

 Reserve areas in remote areas | दुर्गम भागात वनभाज्या तरारल्या

दुर्गम भागात वनभाज्या तरारल्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्याच्या
विविध भागात द:या खो:यात वनभाज्या तरारल्या आहेत़ या भाज्यांची तोडणी करून त्यांची विक्री करणारी लहान-लहान बालके मुख्य मार्गावर सध्या दृष्टीस पडत आहेत़  
सातपुडय़ाच्या दुर्गम भागात सध्या कंटूर्ले, मोखा, हादगा फुले, केनिया, चिंचाची पाने, शेवगा, पिप्राची पाने, उंबराची पाने, सीरपूल, आहले, टेंभडे, जंगली सुरण, रानकेळी,
कूल्र्या, जंगली वेल कांदा, हागवेल, टाकणा, उकीवडा, माटला, आंबाडी, हेल्टा, पानङोल, अंबाडी, मोखा, नलभाजी, जंगली कांदा, वाज, शेवगा, पोवाडय़ा, भोपळापाला,
उंबरपाला, ओहवाडेग या भाज्यांचा हंगाम आह़े यातील काही भाज्या ह्या द:याखो:यात तर काही शेतबांधावर उगवल्या आहेत़ औषधी गुणधर्म असलेल्या या भाज्यांची
तोडणी करून सुकवण्यासह विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्यात आदिवासी महिला गर्क आहेत़ येत्या काही दिवसात या भाज्यांची आवक वाढणार आह़े या भाज्यांची विक्री
महिला सोमवारी होणा:या आठवडे बाजारातही करत असल्याचे दिसून येत आह़े नागरिकांची पसंती मिळत असलेल्या वनभाज्यांची विक्री वाढल्याने अनेक महिलांना रोजगार
मिळाला आह़े सातपुडय़ातील विविध भागातून अक्कलकुवा आणि तळोदा येथील बाजारातही दररोज भाज्या विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती आह़े 
 

Web Title:  Reserve areas in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.