भोंगरे येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

By admin | Published: February 3, 2017 11:51 PM2017-02-03T23:51:51+5:302017-02-03T23:51:51+5:30

महिला एकीचा विजय : पोलीस प्रशासन व दारूबंदी विभागाकडून सहकार्याची अपेक्षा

Resolution of the drinking water bill in Gram Sabha in Bhongre | भोंगरे येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

भोंगरे येथील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

Next


मंदाणे : शहादा तालुक्यातील भोंगरे येथे झालेल्या ग्रामसभेत कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. बंदीच्या निर्णयानंतर कोणी दारू विक्री करताना आढळून आल्यास त्या विक्रेत्याला 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता विवेकानंद पावरा होत्या. सभेनंतर ग्रामस्थांनी गावातून रॅली काढली.
याबाबत वृत्त असे की, मंदाणे येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या 100 टक्के आदिवासी लोकवस्तीच्या भोंगरे गावात गेल्या अनेक वर्षापासून गावठी हातभट्टीच्या दारूची अवैधरित्या खुलेआम विक्री सुरू होती. त्यामुळे अनेकांना दारू पिण्याचे व्यसन जडले. या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काहींना जीवही गमवावा लागला आहे. दारू विक्री बिनबोभाटपणे होत असल्याने महिला  कमालीच्या त्रस्त झालेल्या आहेत. परिसरातील मंदाणे, वडगाव, तितरी, घोडलेपाडा, नवानगर, दूधखेडा आदी गावांमध्ये दारूबंदी अनेक वर्षापासून झालेली आहे. त्यामुळे दारू पिणा:यांचा ओढा हा भोंगरे गावाकडे असायचा. सकाळ, संध्याकाळ दारू पिणा:यांची भोंगरे गावात गर्दी राहायची. मिळेल त्या वाहनाने दारू पिणारे भोंग:याला पोहचायचे. त्यामुळे बाहेरून येणा:या लोकांचाही भोंगरे ग्रामस्थांना मोठय़ा प्रमाणावर त्रास व्हायचा. तसेच गावातील शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात आली होती. तरुण पिढी, शिक्षण घेणा:या तरुणवर्गावरही विपरित परिणाम होऊन भावी पिढीचे भविष्य धोक्यात आले होते.
दहा हजारांचा दंड
भोंगरे गावात संपूर्ण दारू विक्री बंद करण्याचा ठराव झाल्यानंतर कोणी दारू विक्री करताना आढळल्यास त्या विक्रेत्याकडून जागेवरच 10 हजार रुपयांचा दंड आकारण्याचाही निर्णय एकमताने ह्या सभेत घेण्यात आला. या सभेच्या ठरावासह इतिवृत्ताच्या नकला शहादा पोलीस ठाणे, शहादा तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे स्वतंत्रपणे ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आल्या असून दारू विक्रेत्यावर व पिणा:यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
गावात रॅली
भोंगरे गात संपूर्ण दारूबंदीचा ग्रामसभेत ठराव झाल्यानंतर व ग्रामसभा आटोपल्यानंतर उपस्थित सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थ, महिला व तरुणांनी गावात प्रत्येक गल्लीबोळातून दारूबंदीविषयी जनजागृती रॅली काढली. त्या वेळी ग्रामस्थांनी दारूबंदीला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शविला.
हजारो लीटर दारूची विक्री
भोंगरे गावात सुमारे 30 ते 35  दारू विक्रेते दररोज हजारो लीटर दारूनिर्मिती करून विक्री करीत होते. तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच जवळच्या मध्य प्रदेश राज्यातील सीमा भागातील खेतिया, पानसेमल याठिकाणी दारूची खुलेआम वाहतूक केली जात होती. तसेच परिसरातील असंख्य मद्यपी भोंगरे गावातच रात्रंदिवस ठाण मांडून राहायचे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच असल्याने ग्रामस्थ व महिलावर्गाची सहनशीलतेचा अंतच झाला. परिसरात कुठे लग्न सोहळा तर कुठे दशक्रिया विधी कार्यक्रम अशा ठिकाणीदेखील येथून मोठय़ा प्रमाणात दारू आणली जात होती. ग्रामस्थांनी निर्धार करून दारूबंदीचा ठराव एकमताने पारित केला.
पोलिसांची भूमिका महत्त्वाची
भोंगरे गावात दारूबंदीचा निर्णय झाल्याने पोलीस यंत्रणा तसेच दारूबंदी अधिका:यांनी कडक भूमिका घेऊन अवैधरित्या दारू विक्री करणा:यांवर कडक कारवाई करावी व परिसरातही दारू अड्डय़ांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    (वार्ताहर)



दारू विक्रीमुळे गावात दिवसभर वर्दळ

4भोंगरे गावात दारू विक्रेत्यांची संख्याही मोठी असल्याने व गावातील तसेच बाहेरून येणा:यांचीही संख्या मोठी असल्याने गावात दिवसभर वर्दळ राहायची. दारू पिणा:यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारीच्या घटना नित्याच्या झाल्या होत्या. त्यामुळे या सर्व प्रकारांना ग्रामस्थांसह महिलावर्ग पूर्णपणे वैतागला होता. याबाबत अनेकांनी ग्रामपंचायतीकडे दारूबंदी करण्याची मागणी केली. त्यामुळे येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या वेळी सरपंच सुनीता विवेकानंद पावरा, उपसरपंच भरत भिल, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


भोंगरे ग्रामस्थांनी संपूर्ण दारूबंदीचा ठराव केल्याने हा निर्णय कौतुकास्पद असून गावात कोणी अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत ग्रामस्थांना पूर्णपणे सहकार्य केले जाईल. कोणतीही गय केली जाणार नाही. याबाबत कोणाला तक्रार करावयाची असेल त्यांनी सरळ माङयाशीच संपर्क करावा. दारूबंदीच्या कार्यवाहीबाबत असलोद दूरक्षेत्रातील पोलीस यंत्रणेला कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- शिवाजी बुधवंत, पोलीस निरीक्षक, शहादा

Web Title: Resolution of the drinking water bill in Gram Sabha in Bhongre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.