नवानगर ग्रामस्थांचा जलसंधारण कामासाठी श्रमदानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:10 PM2018-04-28T13:10:54+5:302018-04-28T13:10:54+5:30

Responding to the labor for the water harvesting work of residents of Navanaggaon | नवानगर ग्रामस्थांचा जलसंधारण कामासाठी श्रमदानाला प्रतिसाद

नवानगर ग्रामस्थांचा जलसंधारण कामासाठी श्रमदानाला प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे : शहादा तालुक्यातील नवानगर ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून रणरणत्या उन्हातही टेकडय़ांवर श्रमदान कार्यात मोठी आघाडी घेतली आहे. अतिशय कठिण भागात टेकडय़ांवर चढून मोठ मोठय़ा चा:या खोदकामासाठी संपूर्ण गाव लोटल्याने जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ग्रामस्थांचे कौतुक करीत स्वत: तासभर श्रमदान केले.
मंदाणे गावापासून अवघ्या पाच ते सहा किलो मीटर अंतरावर मध्यप्रदेश सीमेलगत व गोमाई नदीच्या किनारी असलेले नवानगर हे 100 टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव. या गावाची लोकसंख्या सुमारे 2165 इतरकी आहे. माजी आमदार शंकर फुगरा जाधव यांचे गाव म्हणून नवानगरचे नाव पुढे आले. ह्या गावाचे वैशिष्टय़े म्हणजे ग्रामस्थांची एकजूट ह्या एकजुटीमुळे गावात 15 वर्षापासून दारू बंदी तसेच 100 टक्के हगणदारीमुक्त व तंटामुक्त, अंगणवाडीसह प्राथमिक शाळा डिजिटल आहे. उपक्रमशील गाव म्हणून नवानगर जिल्ह्यात आदर्श ठरत आहे.
स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
पाणी फाऊंडेशनतर्फे संपूर्ण राज्यभरात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा भारतीय जैन संस्थेच्या सहकार्याने आयोजित करून श्रमदानातून पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिम हाती घेण्यात आली आहे. दिवसेंदिवस पजर्न्यमान कमी कमी होत असल्याने भविष्यात पाणी समस्या रौद्र रूप धारण करणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाला पाण्याचे महत्त्व समजून पावसाचे वाहून जाणारे पाणी जागच्या जागी अडवून त्याचा काटकसरीने वापर करण्यावर पाणी फाऊंडेशनचा भर आहे. या पाश्र्वभूमिवर नवानगर ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेवून श्रमदानाच्या कार्यात प्रचंड आघाडी घेतली आहे. येथील जिल्हा परिषदेचे सदस्य सुनील चव्हाण, सरपंच प्रविण जाधव, उपसरपंच गणेश चव्हाण, सखाराम जाधव, मंगलेश्वर पावरा, दिलीप चव्हाण, अनिता वळवी, ममता चव्हाण यांनी ठाणेपाडा येथे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण घेवून त्यांनी ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले व पाणी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची माहिती या वेळी देण्यात आली. या स्पर्धेत भाग घेण्याचे सर्वानमुते ठरवून प्रत्यक्ष 8 एप्रिल रेाजी दुपारी श्रमदानाचा शुभारंभ करण्यात आला. नवानगर गाव परिसरात मोठ मोठय़ा टेकडय़ा असल्याने सी.सी.टी. चा:या खोदणे उपयुक्त व सोयीचे वाटत असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. आतार्पयतच्या अवघ्या दोन आठवडय़ातच परिसरातील टेकडय़ांवरील कामांमध्ये ग्रामस्थांनी आघाडी घेतली आहे.
रखरखीत उन्हातही श्रमदान
एप्रिल व मे महिना हा अत्यंत तापमानाचा असतांनाही दररोज सकाळी सहा ते दुपारी 1 वाजेर्पयत गावापासून काही मीटरच्या अंतरावर 500 ते 600 ग्रामस्थ महिला, युवक-युवतींनी जावून उंच टेकडय़ांवर चढून भर उन्हात अतिशय कठिण असलेल्या दगडी मुरूमाच्या जागी सी.सी.टी.च्या चा:या श्रमदानातून खोदण्यात येत आहेत. उन्हाचे चटके सहन करीत ग्रामस्थांचा श्रमदानात उन्हात व कामातील घेतलेली आघडी यामुळे जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी थेट नवानगर गाठले. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, ज्येष्ठ नेते डॉ.कांतिलाल टाटीया, नायब तहसीलदार उल्हास देवरे, वनक्षेत्रपाल अनिल पवार, मंडळ अधिकारी एम.आर. लहाने, तलाठी एस.बी. भंडारी, वनविभागाचे बोरूडे, जी.एस. वसावे, तलाठी डी.एस. चौधरी, मंदाणे उपसरपंच अनिल भामरे, प्रा.संपत कोठारी, प्रशांत मोरे, नंदलाल बाफणा आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका:यांनी केले श्रमदान
नवानगरला पाणी फौऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट देवून कामाचे कौतुक केले व स्वत: तास भर श्रमदान केले. त्यांनी सीसीटी चारी खोदली. 
 

Web Title: Responding to the labor for the water harvesting work of residents of Navanaggaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.