अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 12:23 PM2020-12-20T12:23:50+5:302020-12-20T12:23:56+5:30

अमृत आहारमधील गैरप्रकार प्राथमिक स्तरावर महिला व बालविकास विभागानेही मान्य केल्यानेच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश दिले आहेत. ती चौकशी झालीच पाहिजे. -लतिका राजपूत

Responsibility should be fixed on all concerned | अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

अमृत आहार गैरप्रकार :सर्व संबधीत घटकांवर जबाबदारी निश्चित करावी

Next

संडे स्पेशल मुलाखत

मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
लॅाकडाऊनमध्ये जनतेला गावोगावी रेशनचे मोफत धान्य पोहचू शकते तर अंगणवाडी सेविकांना अमृत आहारचा पुरवठा का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील ठेकेदार तयार असतांना थेट पुण्याचा ठेकेदार नेमण्याची गरज काय? आहार पुरवठ्यात झालेल्या दिरंगाईची आणि गैरप्रकाराची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी व कुणा एकावर नव्हे तर त्यातील संबधीत सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी आमची आजही मागणी कायम असल्याचे हा गैरप्रकार उघड करणारे व नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या तसेच जिल्हा व राज्य गाभा समितीच्या अशासकीय सदस्या लतिका राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले. 

योजनेतील गैरप्रकार आपल्या कशा लक्षात आला?
लॅाकडाऊनच्या काळात अर्थात एप्रिल व मे महिन्यात अमृत आहार मिळतो का? म्हणून सहज चौकशी केली, तर अनेक ठिकाणी तो उपलब्ध झाला नसल्याचे दिसून आले. २१ मे रोजी गाभा समितीच्या राज्य बैठकीत हा मुद्दा मांडला. तेथे वाटप सुरू असल्याचा दावा करण्यात आला. पुन्हा तपासणी केली परंतु तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर जून महिन्यात ब्लाॉक लेव्हलचा बैठका झाल्या त्यावेळी वाटपाचे नियोजन सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माल कुठून येतो आहे विचारणा केली तर खालून वरपर्यंत सर्वांचे एकच उत्तर वरून येत आहे एवढेच होते. त्यानंतर खोलात जाऊन तपास केला असता पुणे येथील ठेकेदार असल्याचे स्पष्ट झाले आणि गौडबंगाल समोर आले. मिडियानेही यासंदर्भात वृत्त प्रकाशीत केले. २४५ अंगणवाडीव्यतिरिक्त इतर कुठल्याही अंगणवाडीत आहार पुरवठा झाला नव्हता हे सिद्ध झाले आहे. आता त्यातील गैरप्रकार बाहेर निघावे हीच आमची मागणी आहे. 

दोन्ही समितींकडून मवाळपणा का? 
जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली त्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी नेमले गेले. जिल्हा परिषदेचा गैरप्रकार जिल्हा परिषदेचे अधिकार करणार तर तो चौकशी अहवाल कसा राहील हे स्पष्टच आहे आणि झालेही तसेच. नंतर नेमलेल्या समितीनेही दुर्गम भागातील अंगणवाडींमध्ये चौकशी न करता सपाटीवरील भागातील अंगणवाडीची चौकशी करून अहवाल सादर केला. आता राज्य स्तरावरूनच आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याने सर्व काही स्पष्ट होईल.
पुढची भुमिका काय?
या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहेच, परंतु दोन महिने आहार पोहचला नाही. लाभार्थी लाभापासून वंचीत राहिले. या सर्वांची आता निपक्षपातीपणे चौकशी होईल तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा सुरूच ठेवणार आहोत. 

Web Title: Responsibility should be fixed on all concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.