रेस्टॉरंट व बार देखील सायंकाळी सात वाजेपर्यंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:17 PM2020-10-05T13:17:32+5:302020-10-05T13:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेस्टॉरंट व बार त्यांना दिलेल्या अनुज्ञप्तीच्या वेळेऐवजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेस्टॉरंट व बार त्यांना दिलेल्या अनुज्ञप्तीच्या वेळेऐवजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा राहणार आहे. दरम्यान, बाजारपेठची वेळ देखील सायंकाळी सात वाजेपर्यंतच आहे.
शासनाने मिशन बिगेन अंतर्गत हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास सोमवार, ५ आॅक्टोबरपासून परवाणगी दिली आहे. त्याअंतर्गत बार, रेस्टॉरंट चालकांनी तयारीही सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या आधी त्यांना रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा अर्थात त्यांच्या अनुज्ञप्तीत जी वेळ असेल त्यानुसार ते सुरू राहत होते. आता मात्र परवाणगी दिली असली तरी वेळ मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंतच कायम राहणार आहे. त्यानंतर सुरू ठेवल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील बाजारपेठांच्या वेळा सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आहेत. त्याच अंतर्गत बार, हॉटेल, रेस्टॉरंटचीही वेळ राहणार आहे. हॉटेल, बारमध्ये क्षमतेपेक्षा निम्मे जणांना प्रवेश आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्याही सुचना दिल्या आहेत.