जीएसटीचा परिणाम.. नंदुरबार जिल्ह्यात कॉमर्सच्या जागा ‘हाऊस फुल्लं’
By admin | Published: July 4, 2017 03:40 PM2017-07-04T15:40:03+5:302017-07-04T15:40:03+5:30
नंदुरबार जिल्ह्यातील विद्याथ्र्याचा व पालकांचा शैक्षणिक कल
Next
>भूषण रामराजे/ऑनलाईन लोकमत
नंदुरबार : मुलांनी शिकून डॉक्टर नाहीतर, इंजिनियर व्हावं म्हणून 11 वी सायन्स घेण्यासाठी तगादा लावणा:या पालकांचे मतपरिवर्तन झाले आहे. यंदा जीएसटी आणि व्यवसाय शिक्षणामुळे कॉमर्स शाखेल प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परिणामी नंदुरबार जिल्ह्यातील कॉमर्स शाखेच्या सर्व आठ तुकडय़ा हाऊसफुल आहेत़
नंदुरबार जिल्ह्यात अकरावीच्या कॉमर्स शाखेसाठी तब्बल 720 जागा आह़े 10 वीच्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर विद्याथ्र्यानी या शाखांचे अर्ज घेऊन भरून दिल्याने 99 टक्के जागा ह्या ‘कायम’ झाल्या आहेत़ उर्वरित विद्याथ्र्याना प्रवेश मिळत नसल्याने त्यांचे पालक धडपडत आहेत़ नंदुरबार शहरातील जीटीपी महाविद्यालयात 120 विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेली एक, डी़आऱकनिष्ठ महाविद्यालयात 160 विद्याथ्र्यासाठी दोन, कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात 80 क्षमतेची एक, सार्वजनिक हायस्कूल नवापूर येथे 80 च्या क्षमतेची एक, शिवाजी हायस्कूल नवापूर येथे 80 च्या क्षमतेची एक, शहादा येथील विकास कनिष्ठ महाविद्यालयात 80 विद्याथ्र्याच्या क्षमतेची एक तर तळोदा येथील कनिष्ठ महाविद्यालयात 120 विद्यार्थी क्षमतेची एक अशा तब्बल आठ तुकडय़ा आहेत़ या आठ तुकडय़ांमध्ये 720 विद्याथ्र्याना प्रवेश देण्यात येत होता़ गेल्या दोन वर्षापूर्वी या वर्गासाठी विद्यार्थी शोधण्याची जबाबदारी प्राध्यापकांची होती़
दुर्गम भागात मुल शोधायला जाणा:या शिक्षकांप्रमाणे प्राध्यापकही तुकडी टिकवण्यासाठी विद्याथ्र्याचा शोध घेत त्यांची ‘मनधरणी’ करत होत़े यंदा मात्र याउलट चित्र आह़े पहिल्या दिवसापासून अर्जाची विक्रमी विक्री आणि तेवढय़ाच अर्जाचा भरणा करून अॅडमिशन पक्के करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धडपड सुरू होती़ यातून जिल्ह्यात कॉमर्स शाखा पूर्णक्षमतेने भरली आह़े जीएसटी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये खुणावणा:या कॉमर्स शाखेच्या विद्याथ्र्याना नोक:या यामुळे जिल्ह्यात हा बदल झाल्याचे बोलले जात आह़े