पाऊस लांबल्याने पेरण्यांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:50 PM2018-06-18T12:50:22+5:302018-06-18T12:50:22+5:30
शेतकरी चिंतातूर : नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात पाण्याची पातळी खोल
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतक:यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आह़े राज्यात इतरत्र सर्व ठिकाणी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली असली तरी, नंदुरबारात मात्र पावसाने पाठ फिरवली असल्याने येथील शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े
जिल्ह्यात प्रत्यक्ष मान्सूनने हजेरी लावली नसली तरी, शेतक:यांकडून शेते भुसभुशित करणे, खत देणे आदी कामे करण्यात आली आहेत़ नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, शिंदे, कोळदे, बामडोद, खोंडामळी, खोडसगाव, समशेरपूर, पथराई, धमडाई, दहिंदुले, न्याहली, धानोरा, वैदाणे आदी परिसरातील शेतक:यांकडून ज्वारी, कापूस, पपई, ऊस आदी पिके घेण्यात येत आहेत़
अनेक शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याचा कापूस, पपई पिके घेत असतात़ सध्या खरिपाची तयारी करण्यात येत असली तरी, पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े आधीच येथील कुपनलिका, विहिरी आदी जलस्त्रोतांनी तळ गाठला आह़े त्यामुळे येथील शेतक:यांची पीक पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत़ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव झाला आह़े त्यात, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग मात्र कोरडाच आह़े वर्षानुवर्षे या भागात पजर्न्यमान अल्प असत़े त्यामुळे येथील धरणे, तलाव, विहिरी पूर्ण क्षमतेने भरत नसल्याच्या व्यथा शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पाण्याअभावी येथील पिके गळून पडत असतात़
यंदा पेरणी उशिराने
मान्सून वेळेवर असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होत़े परंतु वातावरणीय अडथळ्यांमुळे पाऊस लांबण्याची चिन्हे दिसून येत आहेत़ त्यामुळे शेतक:यांकडूनही आता पेरणी उशिराने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े पावसाची अनिश्चितता असल्याने पेरणी करुनही पाऊस न आल्यास आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आह़े त्यामुळे शेतक:यांकडून घाई न करता पावसाची प्रतीक्षा करुन चांगला दमदार पाऊस आल्यावरच पेरणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आह़े
जिल्ह्यात यंदा विविध संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम ब:यापैकी झाली आहेत़ त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचे ब:यापैकी सिंचन होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आह़े गावतलावातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, चारी खोदणे आदी विविध कामे करण्यात आले आहेत़ त्यामुळे यातून पाण्याचे किती सिंचन होणार, याची उत्सूकता ग्रामस्थांमध्येही दिसून येत आह़े प्रकाशा, सारंगखेडा आदी ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाण्याचा साठा होत असतो़ या ठिकाणी पजर्न्यमानही ब:यापैकी असत़े मात्र त्या तुलनेत तालुक्यातील पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असत़े तापी नदीवरील उपसा जलसिंचन योजना सुरु झाल्यास हा परिसरसुध्दा सुजलाम् सुफलाम् होणे शक्य असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तापी-बुराई नदी प्रकल्पालाही चालना मिळण्याची अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े