शहादा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 07:33 PM2019-03-26T19:33:47+5:302019-03-26T19:34:22+5:30
निवडणूक : पाच ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा
शहादा : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला़ पाचही ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने दावा केला असून निवडलेल्या निकालांच्या घोषणेनंतर पाचही गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच आणि विजयी उमेदवारांच्या मिरवणूका काढण्यात आल्या़
जाहिर करण्यात आलेल्या निकालात वरूळ तर्फे शहादा ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी गिरधर मंगा पाटील, जुनवणे- प्रकाश जयसिंग पवार, शिरूर दिगर-सुकलाल लक्ष्मण भिल यांचा विजय झाला़ प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करत त्यांनी विजय मिळवला़ तर बुपकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगलाबाई नवनीत पवार व पिंपळोद दिलवर रुबाबसिंग पवार हे बिनविरोध निवडून आले़ तालुक्यात ५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता़ दरम्यान बुपकरी व पिंपळोद ग्रामपंचायत बिंनविरोध झाली होती. शिरुड दिगर, वरुळ तर्फे शहादा व जुनवणे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते़ व वरूळ तर्फे शहादा येथील सहा तर जुनवणे येथे चार सदस्यही रिंगणात होते़
शहादा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली़ वरूळ तर्फे शहादा येथे सरपंच पदासाठी थेट लढत रंगली होती़ यात गिरधर मंगा पाटील हे निवडून आले़ तर सदस्यपदी दिपक साहेबराव ब्राह्मणे, माया ओंकार भिल, चतुर गिरीधर भिल, अक्काबाई रूपसिंग भिल, गोपाल लिंबा पाटील, मुन्नीबाई शिवदास बागुल निवडून आल्या़ जुनवणे येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते यात पवार प्रकाश जयसिंग हे निवडून आले़ सदस्यपदी योगिता दशरथ बागले, प्रकाश जयसिंग पवार, कविता प्रकाश पवार, सोनल विलास पवार हे निवडून आले़ शिरुड दिगर येथे सरपंच पदासाठी चार उमेदवार रिंगणात होते़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार मनोज खैरनार ,नायब तहसीलदार रामजी राठोड, तहसील कर्मचारी किशोर भांदुर्गे, आनंद गिरासे यांनी काम पाहिले़