महसूल कर्मचा:यांचे सामूहिक रजा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:25 PM2019-08-29T12:25:17+5:302019-08-29T12:25:21+5:30
ंलोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचा:यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन करत निदर्शने केली़ आंदोलनामुळे जिल्हा ...
ंलोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचा:यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन करत निदर्शने केली़ आंदोलनामुळे जिल्हा व तालुकास्तरावरील कामकाजावर परिणाम झाला होता़
बुधवारी झालेल्या या सामूहिक रजा आंदोलनादरम्यान कर्मचा:यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे देत घोषणाबाजी केली़ यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आल़े निवेदनात सहा वर्षापूर्वी शासनाने महसूल कर्मचा:यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या होत्या़ परंतू यानंतर मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यवाही न केल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे म्हटले आह़े
संघटनेकडून जुलै महिन्यापासून आंदोलन सुरु आहेत़ येत्या 31 ऑगस्ट रोजी कर्मचारी 1 दिवसाचा लाक्षणिक संप तर 5 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आह़े निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संदीप परदेशी, सरचिटणीस एम़एस़निकम, डॉ़ हेमंत देवकर, यु़ व्ही़वाघ, एस़एस़मुळे, दिलीप पाडवी, गणेश बोरसे, प्रभाकर राठोड, गुणवंत पाटील, महेंद्र कदमबांडे, हिरालाल गुले, दिनेश रणदिवे, तुषार साळूंखे, सुभाष शिंदे, संदीप रामोळे, लोटन धनगर आदींच्या सह्या आहेत़
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व पुरवठा विभागाच्या सर्वच कक्षांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता़ आंदोलनात नंदुरबारसह शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव व नवापुर तहसील कार्यालयातील कर्मचा:यांनी सहभाग नोंदवत निदर्शन करुन धरणे दिले होत़े