नवापूर तालुक्यातील खडकी येथे पाणलोट योजनेच्या कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:57 PM2018-01-10T12:57:20+5:302018-01-10T12:57:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील खडकी येथे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. या कार्यक्रमात एकात्मिक पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणा:या योजनेतील कामांचा आढावा घेऊन माहिती देण्यात आली.
संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुभाष गावीत, जि.प. सदस्य अंकुश गावीत, भीमसिंग गावीत, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दीपक पटेल, शहादा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.पी. केवठे, उपप्रकल्प व्यवस्थापक एस.आर. महाले, अक्राणीचे सहायक वनसंरक्षक एस.आर. चौधरी, जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन मांघाडे, तालुका कृषी अधिकारी वसंत चौधरी, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता जयस्वाल, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप वळवी, खडकीचे सरपंच विनायक गावीत, उपसरपंच रुवाजी गावीत, भीमसिंग गावीत, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल पवार आदी उपस्थित होते.
खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, एकत्मिक पाणलोटअंतर्गत अनेक योजना सरकारने दिल्या आहेत. त्यात रॅाकेल विक्री, शेळीपालन, कुक्कुटपालन यासाठी 44 लोकांची निवड करण्यात आली आहे. शेतक:यांसाठीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत 296 लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. जोड व्यवसायासाठी 24 हजार अनुदान व महिला बचत गटासाठी 25 हजार अनुदान व कौशल्य विकास अंतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण मुलांसाठी ऑनलाईन व संगणक प्रशिक्षण, आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वत:चा व्यवसाय सुरु करु शकतात असे सांगून महिला बचत गटाव्दारे बिनव्याजाने कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. उज्वला लाभार्थी योजनेत नंदुरबार जिल्ह्यात दोन लाख गॅस जोडणी मंजूर असून 50 हजार जोडणी वाटप झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले की, पाणलोट ही योजना सन 2008 पासून सुरु आहे. त्यात ग्रीन हाऊस योजना, उपसा सिंचन योजना, जोड व्यवसायात कुक्कटपालन, शेळीपालन, संजय निराधार योजना व विविध आजारांसाठी योजना अशा 11 ते 12 योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
खडकीच्या माजी सरपंच सविता सुभाष गावीत, चितवीचे सरपंच दिनेश गावीत, रमेश गावीत, दौलत कोकणी, जयपाल गावीत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वागदीचे सरपंच किसन गावीत यांनी तर आभार उमेश भदाणे यांनी मानले.