सरदार सरोवर पुनर्वसनाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:00 PM2019-05-31T12:00:48+5:302019-05-31T12:00:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर पुनर्वसन गावठाण आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक अफरोज अहमद यांनी ...

Review of Sardar Sarovar Rehabilitation | सरदार सरोवर पुनर्वसनाचा आढावा

सरदार सरोवर पुनर्वसनाचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरदार सरोवर पुनर्वसन गावठाण आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे संचालक अफरोज अहमद यांनी महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभागातील अधिका:यांच्या उपस्थितीत आढावा घेतला.
यावेळी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, जमीन समतलीकरण, अनुदान वाटप, प्रकल्पबाधितांचे स्थलांतर, सिंचन सुविधा देणेबाबत, गांवठाण विस्तार, नागरी सुविधा उन्नतीकरण, आरोग्य सुविधा, मुळ गांवातील व पुनर्वसन गांवठाणातील शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, वनसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, साव:यादिगर बिलगांव रस्ता व पूलाचे बांधकामाबाबत संबंधित विभागांकडून झालेल्या कामांबाबत माहिती देण्यात आली. पावसाळा सुरु होण्यापूर्वी सरदार सरोवरच्या ठिकाणी वस्ती करुन राहत असलेली कुटुंबे धोक्याच्या ठिकाणापासून लांब वस्ती आहे याची खात्री करुन घ्यावी. तसेच पुनर्वसन वसाहतीजवळ मुलांच्या शिक्षणासाठी शाळा असाव्यात, असे अहमद यांनी सांगितले. सरदार सरोवर प्रकल्पाबाबत संबंधित विभागांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर पुनर्वसन, शाळा, आरोग्य अशा महत्वाच्या विषयांकडे लक्ष देऊन आवश्यक कामे कालमर्यादेत करावी, असे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी (ससप्र),दत्तात्रय बोरुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा कृषी अधिक्षक बी. एन. पाटील, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे, उपवनसंरक्षक एस. बी. केवटे, उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण पाडवी आदी उपस्थित होते.

Web Title: Review of Sardar Sarovar Rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.