विधीमंडळ एस.टी.समितीतर्फे नंदुरबारात विविध विभागाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:59 PM2018-02-01T12:59:46+5:302018-02-01T12:59:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधीमंडळ एस.टी.समिती गुरुवारी नंदुरबारात दाखल झाली. अध्यक्ष आमदार अशोक उईके यांच्यांसह पाच आमदारांची उपस्थिती आहे. सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यास समितीने सुरुवात केली.
विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा गेल्या सहा महिन्यात तीन वेळा दौरा रद्द झाला होता. गेल्या आठवडय़ात 1 ते 3 फेब्रुवारी असा दौरा निश्चित झाला होता. त्यानुसार गुरुवारी समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार वैभव पिचड, आमदार श्रीकांत शिंदे, आमदार संतोष टारफे हे दाखल झाले. सकाळी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. समितीत एकुण 15 सदस्य असून उर्वरित सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पास्कल धनारे, आमदार संजय उराम, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार अमित घोडा, आमदार पांडूरंग बरोटा, आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार अनंत ठाकुर यांच्यापैकी किती सदस्य सायंकाळर्पयत येतात याकडे लक्ष लागून आहे. शुक्रवारी समिती जिल्हा दौरा करणार आहे.