कठड्यांअभावी दरीवरील वाहतुकीस धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 01:01 PM2020-01-06T13:01:34+5:302020-01-06T13:01:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील महात्वाचा ठरणाऱ्या धडगाव व मोलगी रस्त्यावर कुंडल येथे खोल दरी आहे. रस्त्याच्या अगदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील महात्वाचा ठरणाऱ्या धडगाव व मोलगी रस्त्यावर कुंडल येथे खोल दरी आहे. रस्त्याच्या अगदी कडेपासूनच ही दरी असल्याने तेथे कठड्यांची नितांत आवश्यकता भासत आहे. परंतु संबंधित यंत्रणेमार्फत तेथे अद्याप कठडेच बांधण्यात आले नाही. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही राज्यांचा संपर्क तुटू नये, म्हणून विंध्य व सातपुडा या दोन पर्वत रांगेत डेडीयापाडा ते शिरपूर हा मार्ग तयार करण्यात आला आहेत. या रस्त्यांपैकी दरा ता. शहादा ते मोलगी हा एक रस्ता आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा रस्ता नव्याने तयार झाला. या रस्त्यावर १९६० दशकात काही पुलांसह अन्य कामेही करण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील प्रवासी व वाहनधारकांची सोय होत आहे. परंतु कुंडल येथील खोल दरीवरील अद्याप कुठल्याही प्रकारचे कठडे तयार करण्यात आली नाही. त्यामुळे या दरीवरुन वर्षानुवर्षे धोकेदायक वाहतुक सुरू आहे.
डाब ता. अक्कलकुवा येथे उगम पावणाºया तथा नर्मदेच्या उपनदी असलेल्या देवानंद नदीचा हा घाट पायी प्रवास करणाºया बांधवांना देखील धोक्याचा आहे. तर वाहनांना दुहेरी धोका जाणवत आहे. धडगाव- मोलगी भागातल्या सर्वात मोठा रस्ता असल्याने त्या ठिकाणी कठड्यांची नितांत गरज भासत आहे.
दुर्गम भागातील रस्त्यांवर बहुतांश घाट व दरींवर कठडे बांधण्यात आली असताना या दरीकडे संबंधित यंत्रणेने का दुर्लक्ष केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतुकीसाठी सुविधा असूनही ही दरी तीन राज्यातील प्रवाशांना वषार्नुवर्षे धोक्याचा ठरत आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने या दरीवर कठडे तयार करण्यात यावे, अशी मागणी तिन्ही राज्यातील प्रवासी तथा नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.
४दरीवर कठडे तयार करण्यासाठी आजपर्यंत बांधकाम विभागामार्फत कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही. या दरीची क्षती होत असल्याने तिन्ही राज्यातील प्रवाशांचे संभाव्य संकट टाळण्यासाठी तातडीने कठडे बांधण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कठड्यांबाबत बांधकाम यंत्रणा उदासिन असल्याचे स्पष्ट होत आहे.
४डेडीयापाडा (गुजरात) ते शिरपूरपर्यंत हा मार्ग आंतरराज्य मार्ग म्हणून घोषीत करण्यात आला. तसा हा रस्ता तिन्ही राज्यातील बहुसंख्य गावांना जोडणारा असून महत्याचा देखील आहे. परंतु याची महत्वाकांक्षा संबंधित विभागाला कळली नाही, त्यामुळे तिन्ही राज्यातून शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.