नदी कोरडी मात्र पूल ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:55 AM2019-07-03T11:55:44+5:302019-07-03T11:55:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नेत्रग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा येथील वरखेडी नदी पुलावर मंगळवारी झालेल्या पावसामुळे गुडघ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : नेत्रग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा येथील वरखेडी नदी पुलावर मंगळवारी झालेल्या पावसामुळे गुडघ्या एवढे पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अक्कलकुवा ते खापर परिसरात सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नेत्रग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा व सोरापाडाला जोडणा:या वरखेडी नदीवरील पुलावर गुडघ्या एवढे पाणी साचले होते. राष्ट्रीय महामार्गावरील या पुलाला पडलेल्या जीवघेण्या खड्डय़ामुळे हे पाणी साचल्याचे सांगण्यात येत होते. पुलावर पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत पुलावरून वाहने काढावी लागली.
या पुलावरील खड्डय़ांचा अंदाज वाहनधारकांना येत नव्हता त्यामुळे खड्डय़ामध्ये वाहने आदळली जात होती. अनेक दुचाकीच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने त्या नादुरुस्त झाल्याचे दिसून येत होते. दरम्यान, पुलावर साचलेल्या या पाण्यामुळे नेत्रांग ते शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या झालेल्या दैनावस्थेंमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.