नदी-नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने खेडले शिवारात पिकासह शेती गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:50 PM2019-08-11T12:50:40+5:302019-08-11T12:50:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : परिसरातील शेतांमध्ये नदी-नाल्याचे पाणी शिरल्याने केळी, पपई, कापूस, ऊस, मिरची, ज्वारी या पिकांसह ठिबक सिंचनचे साहित्य वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
बोरद, मोड, खेडले, खरवड, कढेल, आष्टे, कळमसरे, मोहिदा, छोटा धनपूर, लाखापूर (फॉ.), तळवे, आमलाड, धानोरा, चौगाव बुद्रुक, मोरवड आदी गावातील शेतक:यांच्या शेतांमध्ये नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. खेडले शिवारातील उषाबाई दिलीप चौधरी यांच्या शेतात निझरा नदीचे पाणी शिरल्याने दोन एकर क्षेत्रातील केळीचे पीक वाहून गेले. शकुंतलाबाई अशोक चौधरी यांच्या शेतातील मिरची व कापसाचे पीकही वाहून गेले. रोहिदास फकिरा शिंदे, भाईदास फकिरा शिंदे, इंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत, कैलास गोरख पाटील, पुरुषोत्तम रामदास चव्हाण, रमेश गोरख पाटील, चिंतामण कामनकर, आनंदा कामनकर, भगवान देवराम शिंदे, अंबालाल छगन नवले, नरोत्तम कोळी, अनिल कोळी, सुभाष तुमडू पाटील, भिमा गिरधर चौधरी, गुलाबसिंग गिरासे, सुनीता गिरासे, लिंबा कायसिंग वळवी, अशोक प्रल्हाद पाटील, अरुण बुलाखी पाटील, सुभाष भगवान पाटील, नंदूगीर गोसावी, रतिलाल तोताराम पाटील, बुलाखी रामदास पाटील, बबन वेडू चौधरी, रमण टिला चौधरी यांच्यासह इतर शेतक:यांच्या शेतात नदी-नाल्यांचे पाणी शिरल्याने ठिबक सिंचन साहित्यासह पिके वाहून गेली आहेत. नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने झालेल्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक:यांनी केली आहे.
मागीलवर्षी कोरडा दुष्काळ तर यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी निघून जाण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तळोदा तालुक्यातील मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. तळोदा ते बोरद हाच मार्ग सुरू असल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मोड येथील निझरा नदीवरील पुलाचा भराव खचल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी तळोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी.जे. वळवी यांना दूरध्वनीवरुन याबाबत माहिती दिली. वळवी यांनी संबंधितांना पाठवून पुलाला भराव करण्याची सूचना केली आहे. तसेच सातपुडा पर्वतरांगात मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाल्याने झाडे व शेतातील केळी पिकाचे खांब वाहून आल्याने ते ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे पाणी निघण्यास अडचण निर्माण होत असून संबंधित विभागाने ही झाडे काढण्याची मागणी होत आहे.