रस्त्यावरील वळण व पाटचारी अपघाताचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:37 PM2018-12-18T12:37:46+5:302018-12-18T12:38:32+5:30

सोनवद-कहाटूळ रस्ता : मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ

Road at the turn and road accident | रस्त्यावरील वळण व पाटचारी अपघाताचे केंद्र

रस्त्यावरील वळण व पाटचारी अपघाताचे केंद्र

Next

शहादा : तालुक्यातील सोनवद ते कवठळ-कहाटूळ रस्त्यावरील वळण अपघातास आमंत्रण देणारे ठरत असून याठिकाणी बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत   आहे.
सोनवद ते कवठळ-कहाटूळ हा रस्ता रहदारीचा आहे. कवठळ गावालगत कवळीद ते वरुळ कानडीकडे जाणारी पाटचारी आहे. या पाटचारीच्या दोन्ही भागाकडे संरक्षक भिंत किंवा कठडे नाहीत. आठ-दहा फूट खोल पाटचारी असून हे          ठिकाण अपघातांचे केंद्र आहे.              मध्य प्रदेशातील पानसेमलकडे जाण्यासाठी भमराटानाकामार्गे हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर वाहनधारक मोठय़ा प्रमाणात करतात. या रस्त्यावरून एस.टी. बसेसह इतर अवजड वाहनांची ये-जा नेहमी सुरू असते. मात्र हा रस्त्याच्या साईडपट्टय़ा खराब झाल्याने समोरुन मोठे वाहन आले तर एका वाहनाला रस्त्याच्या खाली उतरावे लागते. साईडपट्टय़ांची दूरवस्था व त्या खोल गेल्याने वाहन रस्त्याच्या खाली घेताना अपघात होतात. साईडपट्टय़ांची खडी उखडल्याने चालक रस्त्याखाली वाहन घेण्यास धजावत नाहीत. काहीवेळा या कारणावरून चालकांमध्ये वादही होतात. या रस्त्याच्या साईडपट्टय़ा दीड ते दोन फूट खोल झाल्याने अपघात होत आहेत. 
संबंधित विभागाकडे रस्ता व साईडपट्टय़ांच्या दुरुस्तीसह वळण रस्ता सरळ करणे, पाटचारीच्या आजूबाजूला कठडे बसविणे तसेच फरशी पुलाची उंची वाढविण्याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ व शेतक:यांनी सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Road at the turn and road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.