अप्पर मुख्य सचिवांनी दिल्या रोहयो कामाच्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:34+5:302021-09-19T04:31:34+5:30

नंदुरबार : रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रत्येक शेताला पाणी’ ...

Rohyo work tips given by the Upper Chief Secretary | अप्पर मुख्य सचिवांनी दिल्या रोहयो कामाच्या टिप्स

अप्पर मुख्य सचिवांनी दिल्या रोहयो कामाच्या टिप्स

Next

नंदुरबार : रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रत्येक शेताला पाणी’ आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत कार्यशाळा झाली. यावेळी त्यांनी विविध बाबींचे मार्गदर्शन केेले. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, प्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, मंत्रालयातील रोहयो विभागाचे सहाय्यक संचालक विजयकुमार कलवले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते.

नंदकुमार म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध प्रकारची

कामे घेता येतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोहयोतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावीत. तसेच उपलब्ध असलेल्या सिंचन क्षमतेवर उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा. यासाठी अधिकचे क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली आणावे. त्यासाठी ठिबक सिंचनाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून याची माहिती द्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मनीषा खत्री म्हणाल्या की, शेल्फवरील कामे त्वरित सुरू करण्यात यावीत. अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधून ग्रामस्थांच्या आवश्यकतेनुसार कामे त्वरित सुरू करावीत. रोहयोतून काम वेळेवर उपलब्ध होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा. आगामी काळात या योजनेची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी, जिल्ह्यात रोहयोची कामे खूप

असून ही कामे एक चळवळ म्हणून करावीत असे सांगितले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी ‘रोहयो’च्या अंमलबजावणीबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, जिल्ह्यात स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन द्यावा. यासाठी त्यांच्याशी स्थानिक भाषेतून संवाद साधून रोजगाराविषयी माहिती द्यावी व स्थलांतर रोखण्यासाठी प्रवृत्त करावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी अधीक्षक अभियंता काळे, सहाय्यक संचालक कलवले यांनी रोहयो व मृद संधारणातून करता येत असलेल्या कामांबाबत मार्गदर्शन केले.

उपजिल्हाधिकारी मोरे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी राज्य

प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे, राज्य प्रकल्प अधिकारी (रोहयो) सायली घाणे, प्रवीण सुतार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रम अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी कार्यशाळेस उपस्थित होते.

Web Title: Rohyo work tips given by the Upper Chief Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.