राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:33 PM2019-10-18T12:33:24+5:302019-10-18T12:33:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशात एकता असेल तरच खरे राष्ट्र निर्माण होईल, परंतु या सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यात ...

The role of youth in nation building is important! | राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची!

राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देशात एकता असेल तरच खरे राष्ट्र निर्माण होईल, परंतु या सक्षम राष्ट्र निर्मितीच्या कार्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. म्हणून युवकांनी विविध माध्यामतून योगदान देणे गरजेचे आहे, असा सुर नेहरु युवा केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उमटला.
यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे नेहरु युवा केंद्र व टेनिक्वाईट असोसिएशनतर्फे  वैचारिक जागृती व शैक्षणिक उपक्रमांतर्गत ‘पॉङिाटीव्ह इंडीया’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमात डॉ.उमेश शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक अर्श कौषिक, मुख्याध्यापक सुनिल पाटील, जगदिश चौधरी, डॉ.मयुर ठाकरे, प्रा.राजेंद्र शेवाळे, प्रा.पंकज पाटील, प्रा.शैलेंद्र पाटील, प्रा. जयश्री भामरे, प्रा.एन. एस. पाटील, प्रा. योगेश चौधरी आदी उपस्थित होते. 
यावेळी डॉ. शिंदे यांनी सर्वाचे एकत्रित संघटन ही देशाची गरज असून  एकतेतूनच खरे राष्ट्र निर्माण होईल असे सांगितले. क्रीडाधिकारी पाटील यांनी युवकांचे नाते मैदानाशी जुळले पाहीजे, यासाठी युवकांनी रोज विविध खेळ खेळावेत असे आवाहन केले. अर्श कौशिक यांनी ग्रामीण भागात असंख्य अडचणी असून यासाठी युवकांनी पुढाकार घेत जनजागृती करावी, असे आवाहन केले. विद्यार्थिनी अश्विनी ठाकरे व जितेंद्र माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.एन.एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश्वर चौधरी, संदीप मराठे, सुरज बुवा, आकाश माळी, अभय तलवारे, गिता निकम, अमोल चित्ते यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: The role of youth in nation building is important!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.