रोझवा पुर्नवसन : परसबागेतून भाजीपाल्याचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:53 PM2017-12-14T12:53:50+5:302017-12-14T12:53:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन परिसरात ग्रामस्थांनी अंगणात परसबाग फुलवली आह़े त्यात विविध भाज्या तसेच फळभाज्यांची लागवड करुन स्वतापुरता भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आह़े
सातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुर्नवसन, लक्कडकोट, वरपाडा, जीवननगर पुर्नवसन वसाहत या गावांमधील ग्रामस्थांकडून भाजीपाल्याची लागवड घराच्या परिसरातील परसबागेत करण्यात येत आह़े
यासाठी ग्रामस्थांकडून मोठे परिश्रमही घेण्यात येत आह़े सध्या रब्बी हंगामातील पेरणीही अंतीम टप्प्यात आली आह़े त्यामुळे मोकळ्या वेळेत गृहिणी तसेच युवतींकडून आपापल्या घराच्या अवतीभोवती परसबागा तयार करण्यात आल्या आह़े गावातील महिलांकडून विशेषत या उपक्रमात सहभाग घेण्यात येत आह़े आपल्याला लागणा:या भाजीपाल्याचे उत्पादन परसबागेतच करण्यात येत असल्याने बाजारात जावून भाजीपाला विकत घेणे यातून त्यांचा पैसा व वेळ वाचत असल्याचेही परिसरातील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय शुध्द भाजीपालाही यातून मिळत आह़े ग्रामस्थांनी आपल्या घरातील सांडपाण्याचा निचरा या परसबागांकडे केला आह़े त्यामुळे धुणी-भांडी यात वापरण्यात येणा:या पाण्याचाही पुरेपुर वापर या माध्यमातून होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े परसबागेतून मेथी, वांगे, लसण, कांदा, पालक, टोमॅटो, कोथंबीर, मुळा, भोपळा, गिलके आदी महत्वाच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आह़े त्यामुळे रोज लागणारा गरजेपुरता भाजीपाला ग्रामस्थांना सहज उपलब्ध होत आह़े परसबागेचे संरक्षण व्हावे यासाठी ग्रामस्थांकडून कुंपन बांधण्यात आले आह़े यामुळे पाळीव जनावरांपासून परसबागेचे संरक्षण होत आह़े भाजीपाल्सासह परसबागेतून फळभाज्यांचेही पिक मोठय़ा प्रमाणात लावण्यात आले आह़े या परसबागेतून महिन्याकाठी मोठे उत्पादन मिळत असल्याचे सांगण्यात आल़े