कर्ज देण्याच्या नावाने महिलांची फिरवाफिरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:08 PM2019-06-25T12:08:56+5:302019-06-25T12:09:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भालेर : नंदुरबार तालुक्यातील भालेर परिसरातील महिला बचत गटांच्या महिली कर्जाचे अमिष दाखवून ओरिसा येथील मुख्यालय ...

Rotation of women in the name of lending | कर्ज देण्याच्या नावाने महिलांची फिरवाफिरव

कर्ज देण्याच्या नावाने महिलांची फिरवाफिरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भालेर : नंदुरबार तालुक्यातील भालेर परिसरातील महिला बचत गटांच्या महिली कर्जाचे अमिष दाखवून ओरिसा येथील मुख्यालय असलेल्या फायनान्स कंपनीकडून फिरवाफिरव करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आह़े अवाजवी असे व्याजदर वसुल करणा:या या कंपनीची चौकशी करण्याची मागणी आह़े 
ओरीसा राज्यात मुख्य कार्यालय असलेल्या एका वित्तीय संस्थेची शहादा येथे शाखा आह़े ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट स्थापन करुन त्यांना थेट 22 टक्के व्याज दराने कर्जाचे वाटप करण्यात येत़े
संबधित फायनान्स कंपनीची शहादा येथे एकमेव शाखा असल्याची माहिती आह़े भालेर येथे दोन गटांना प्रत्येकी सभासदास 30 हजार रुपये याप्रमाणे त्यांनी कर्ज दिले आह़े त्यांच्याकडून कर्जाची वेळेवर परतफेड होत आह़े दरम्यान भालेर येथील इतर गरजू महिलांनी एका बचत गटाची स्थापना करुन संबधित कंपनीच्या एजंटांना कर्ज देण्यासाठी संपर्क केला होता़ यानुसार महिलांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या़ यावेळी संबधित कंपनीचे अधिकारी येणार अशी बतावणी करण्यात आली होती़ परंतू प्रत्यक्षात कोणीही अधिकारी किंवा कर्मचा:याने त्याठिकाणी हजेरी लावली नाही़ यानंतर महिलांनी संबधित कंपनीच्या अधिका:यांना संपर्क करुन कजर्मागणी केली असता, त्यांनी अरेरावी केली होती़  बचत गट स्थापन करणे, फाईल तयार करणे यासह विविध कामांसाठी महिलांनी मोठा खर्च केला होता़ कर्ज नाकारले गेल्याने त्यांचा खर्च आणि वेळ वाया गेला आह़े 

ग्रामीण भागात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने गावोगावी महिला आणि पुरुष बँका, खाजगी वित्त संस्था आणि सावकार यांच्याकडून व्याजाने पैसे घेत आहेत़ या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांची धावपळ होत आह़े कोणत्याही प्रकारचे नियमन नसलेल्या या कर्जाचे व्याजदर शासनाने निर्धारित केलेल्या व्याजदरापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आह़े खाजगी वित्त संस्था महिलांच्या बचत गटांच्या नावाखाली त्यांची लूट करत आहेत़ यातून गंभीर प्रकार घडण्याची भिती व्यक्त होत आह़े हप्ता थकल्यानंतर अशिक्षित महिलांकडून दुपटीने रक्कम वसुल केली जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत़ 
 

Web Title: Rotation of women in the name of lending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.