नोकरीसाठी पायपीट करूनही रोजंदारी कर्मचा:यांना न्याय मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:31 PM2018-03-30T16:31:25+5:302018-03-30T16:31:25+5:30

Routine staff: Even after getting scratched for the job, the wage earner gets justice | नोकरीसाठी पायपीट करूनही रोजंदारी कर्मचा:यांना न्याय मिळेना

नोकरीसाठी पायपीट करूनही रोजंदारी कर्मचा:यांना न्याय मिळेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये तासिका आणि रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कर्मचारी आजअखेरीस नंदुरबार ते नाशिक मार्गावरील सोग्रस येथे पोहोचले आहेत़ 150 किलोमीटरची पायपीट करूनही नोकरीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आह़े गेल्या दोन दिवसात त्यांच्या आंदोलनाला वेग आला असला, तरी चर्चेची गु:हाळं थांबलेली नाहीत़   
आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत चालवल्या जाणा:या आश्रमशाळांमध्ये शिक्षकासह वर्ग तीन व  चार संवर्गाची 2 हजार 389 पदे मंजूर आहेत़ दोन्ही प्रकल्प कार्यालय मिळून माध्यमिक आणि प्राथमिकच्या 75 शासकीय आश्रमशाळा तसेच 54 वसतीगृहे आहेत़ याठिकाणी तब्बल 1 हजार 270 शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका, गृहपालसह शिपाई संवर्गाची पदे रिक्त आहेत़ कायम कर्मचारी नसल्याने याठिकाणी तूर्तास बेरोजगार युवक-युवती रोजंदारी आणि तासिका तत्त्वावर ज्ञानदानाचे काम करत आहेत़ 22 मार्च पासून सुरू झालेली त्यांची संघर्ष यात्रा सध्या नाशिक जिल्ह्यातील सोग्रस फाटय़ार्पयत पोहोचली असून बुधवारी नाशिक विभागाचे आदिवासी आयुक्त रामंचद्र कुळकर्णी व मंत्रालयातील उपसचिव दर्जाचे अधिकारी डोके यांनी तेथे भेट देऊन राज्यातून पदयात्रा करत आलेल्या साडेतीन हजार कंत्राटी कर्मचा:यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता़ राज्यभरात रोजंदारी कर्मचारी संघटनेचे पाच हजार सदस्य आहेत़ या पदयात्रेत नंदुरबार जिल्ह्यातून 1 हजार कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय हे सर्वाधिक संख्येने सहभागी झाले आहेत़ 
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी दुपारी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, हेमंत पावरा, कमलाकर पाटील, भगतसिंग पाडवी, रघुनाथ पवार, ममता ठाकूर, ए़पी़सिद्धम यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनही तोडगा निघालेला नाही़ 
नंदुरबार प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित 33 आश्रमशाळा आणि 34 वसतीगृह आहेत़ यासाठी एकूण एक हजार 89 पदे मंजूर करण्यात आली होती़ यात वर्ग 3 संवर्गातील शिक्षकांची 366 पैकी 131, मुख्याध्यापकांची 32 पैकी 22, महिला अधिक्षिकांची 32 पैकी 13, पुरूष गृहपाल 25 पैकी 5, महिला गृहप्रमुख 16 पैकी 4, कनिष्ठ लिपिकांची मंजूर असलेली 62 पैकी 36 पदे रिक्त आहेत़ 
वर्ग चार संवर्गात 25 प्रयोगशाळा परिचरपैकी 6, कनिष्ठ लिपिक 59 पैकी 30, शिपाई 201 पैकी 54, स्वयंपाकी 183 पैकी 42, कामाठी 32 पैकी 14, चौकीदार 32 पैकी 14, चौकीदारांची मंजूर असलेली 21 पैकी 7 पदे रिक्त आहेत़  
तळोदा प्रकल्पांतर्गत 42 आश्रमशाळा आणि 17 वसतीगृह आहेत़ 1 हजार 300 पदे मंजूर करण्यात आली आहेत़ यापैकी शिक्षकांची 350 तर वर्ग 3 व 4 ची 400 पदे रिक्त असल्याची माहिती देण्यात आली आह़े दोन्ही प्रकल्प कार्यालयात एकूण 880 पदे रिक्त असल्याने शाळांमध्ये विद्याथ्र्याचा शैक्षणिकस्तर हा खालावला आह़े अन्न, पुस्तके आणि गणवेश यासाठी विद्याथ्र्याकडून सातत्याने आंदोलने चालवण्यात येत आहेत़ 
तब्बल पाच दिवसांपासून मजल दरमजल करत निघालेल्या या पदयात्रेत नंदुरबार, तळोदा, कळवण, बागलाण, धुळे, यावल यासह राज्याच्या विविध भागातील कंत्राटी कर्मचारी येऊन सामील होत आहेत़ कुटूंबियांसमवेत निघालेल्या अनेकांची मुले ही 1 ते 5 वयोगटात आहेत़ 40 च्या पुढे असलेल्या तापमानाचा मारा सहन करत हे आंदोलनकर्ते मार्गस्थ होत आहेत़ सोग्रस येथे त्यांनी ठिय्या मांडला असून येथे मुंबई येथे गेलेले शिष्टमंडळ परत आल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े आंदोलकांना मार्गावरील गावांमध्ये पाणी आणि अन्न पदार्थ पुरवठा करण्याचे कार्य सेवाभावी संस्था आणि नागरिकांकडून होत आह़े 

Web Title: Routine staff: Even after getting scratched for the job, the wage earner gets justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.