रोझवा शिवार : ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:38 PM2018-01-30T12:38:29+5:302018-01-30T12:38:36+5:30

ROVWA SHIERD: Inflation of 'Whip Kine' Disease | रोझवा शिवार : ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव

रोझवा शिवार : ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या ऊस पट्टयात ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े
रोझवा, गोपाळपूर, रांझणी, पाडळपूर, प्रतापपूर परिसरात यंदा उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आह़े परंतु या परिसरात ‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिणामी शेतक:यांकडून बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े 
‘चाबूक काणी’ रोगाचा प्रादुर्भाव बुरशीमुळे होत असल्याचे जाणकार शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े रोगाच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या शेंडा चकचकीत चंदेरी रंगाचा तसेच चाबकाप्रमाणे निमुळता होत जातो़ या चंदेरी पट्टयावरील आवरण फाटत असत़े त्यामुळे आतील काळा भाग उघडा होऊन त्यातील बुरशीचे किटक हवेत पसरले जात असतात़ त्यामुळे परिणामी चांगल्या उसालादेखील या रोगाची लागण होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े  
दरम्यान, या रोगाचा प्रादुर्भाव लागवडीचा ऊस तसेच खोडवा ऊस या दोन्हींवरही दिसून येत आह़े त्यामुळे परिसरातील शेतक:यांकडून बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े सध्या या रोगामुळे उसाची वाढ खुंटली असल्याचे चित्र दिसून येत आह़े प्रादुर्भावामुळे ऊस बारीक होऊन उसाची पाने अरुंद व लहान होत आहेत़ 
यामुळे याचा परिणाम उसाच्या दर्जावरही होत असल्याचे दिसून येत आह़े साहजिकच याचा फटका शेतक:यांच्या उत्पन्नावरही होण्याची शक्यता आह़े 
 

Web Title: ROVWA SHIERD: Inflation of 'Whip Kine' Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.