बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या खात्यांवर 29 कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:02 AM2018-11-03T11:02:39+5:302018-11-03T11:03:06+5:30
तिस:या हप्त्याची रक्कम : 31 हजार शेतकरी
नंदुरबार : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 31 हजार कापूस उत्पादक शेतक:यांना 29 कोटी रूपयांची मदत शासनाकडून देण्यात आली आह़े शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला रक्कम प्राप्त झाल्यानंतर तात्काळ शेतक:यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कारवाई सुरु झाली होती़
2017 च्या खरीप हंगामात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक:यांचे नुकसान झाले होत़े यातून 85 हजार शेतकरी बाधित झाले होत़े यासाठी शासनाकडून 89 कोटी 65 लाख 22 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ यातील 54 हजार 817 शेतक:यांना पहिल्या हप्त्यात 23 कोटी 90 लाख तर दुस:या टप्प्यात 35 कोटी 86 लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होत़े परंतू 31 हजार शेतकरी मदतीपासून वंचित होत़े या शेतक:यांकडून वारंवार प्रशासनाकडे विचारणा करण्यात येत होती़
चार तालुक्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी बोंडअळीच्या पैशांसाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये विचारणा करत होत़े शुक्रवारी सायंकाळी अनेकांच्या खात्यांवर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मोबाईलद्वारे एसएमएस मिळाल्यानंतर त्यांच्याकडून आनंद व्यक्त करण्यात येत होता़ शुक्रवारी या अनुदानाचा 29 कोटी 89 लाख 22 हजार तिसरा हप्ता प्राप्त झाला़ यानुसार नंदुरबार तालुक्यात 10 कोटी 92 लाख 53 हजार, नवापूर 2 कोटी 58 लाख 74 हजार, अक्कलकुवा 48 लाख 90 हजार, शहादा 14 कोटी 64 लाख 16 हजार, तळोदा 1 कोटी 12 लाख 45 हजार आणि धडगाव तालुक्यात 12 लाख 41 हजार रूपये बोंडअळीग्रस्त शेतक:यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत़ ही रक्कम तहसीलदारांच्यामार्फत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े