केसेच्या टार्गेटसाठी आरटीओ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:54 PM2020-12-27T12:54:58+5:302020-12-27T12:55:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  वर्ष अखेरीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी आरटीओ विभागाची धावपळ सुरू आहे. सुटीच्या दिवशी देखील अर्थात ...

RTO on the road for case targets | केसेच्या टार्गेटसाठी आरटीओ रस्त्यावर

केसेच्या टार्गेटसाठी आरटीओ रस्त्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  वर्ष अखेरीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी आरटीओ विभागाची धावपळ सुरू आहे. सुटीच्या दिवशी देखील अर्थात शनिवारी जिल्ह्यात ६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. एकुण पाच लाख १३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
वर्षअखरेचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी विविध विभाग सरसावले आहेत. त्यात आरटीओ विभागाने देखील कंबर कसली आहे. सलग सुट्टया असतांनाही कर्मचारी व अधिकारी ड्यूटीवर आहेत. शनिवारी कारवाईची मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर दंड वसुल करण्यात आला. ४० ट्रका आणि १५ बसेस यांची तपासणी करून विविध कागदपत्रांची पुर्तता नसणे यासह इतर बाबींआधारे कारवाई करण्यात आली. नंदुरबारातील चारही प्रमुख रस्त्यांवर आरटीओची वाहने उभी असलेलीे दिसून येत होती. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी आपला मार्ग बदलल्याचे चित्र देखील होते. कारवाई करण्यात आलेली वाहने ही नंदुरबार, शहादा, प्रकाशा, नवापूर येथे जमा करण्यात आली आहेत. गुजरात, मध्यप्रदेशसह जिल्ह्यातील वाहनांवरही कारवाई करण्यता आली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमरतेमुळे सुटीच्या दिवशी देखील कारवाईसाठी रस्त्यावर उतरून मोहिम राबवावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यापुढेही ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आरटीओ अधिकारी गिरिष पोतदार, अजय सूर्यवंशी, अजय चौधरी, हरिष पोतदार, नितीन सूर्यंवशी, हिराजी कुरेकर व कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: RTO on the road for case targets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.