मागील भानगडीच्या वादातून दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:28 AM2017-09-08T11:28:43+5:302017-09-08T11:28:43+5:30
18 जणांना अटक : वाहन व घरांचे नुकसान, नियंत्रणासाठी अश्रुधुराचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मागील भानगडीच्या वादातून शहरातील नवनाथ टेकडी भागात दोन गटात हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दगडफेक करण्यात आली. त्यात चार घरांचे व पाच वाहनांचे नुकसान झाले. जमाव आटोक्यात येत नसल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे दोन नळकांडे फोडले. 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 11 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नंदुरबारातील नवनाथ टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीत गुरुवारी उत्तर रात्री ही घटना घडली. 21 रोजी या परिसरातील दोन गटात हाणामारी झाली होती. तेंव्हापासून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. त्याचा उद्रेक गुरुवारी उत्तररात्री अडीच वाजेच्या सुमारास झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठय़ा, काठय़ा, दगड, विटांनी मारा केला. पाच वाहनांचेही नुकसान करण्यात आले. याशिवाय तीन ते चार घरांनाही या घटनेची झळ पोहचली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली, परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर अश्रुधुराच्या दोन नळकांडय़ा फोडल्या. त्यानंतर जमाव नियंत्रणात आला. पोलिसांनी दोन्ही गटाच्या वसाहतीत अधिकचा बंदोबस्त तैणात केल्यावर शांतता झाली.
यावेळी पोलिसांनी 19 जणांना अटक केली. त्यात वसीम अब्दुल रहिम बागवान, अब्दुल माजिद अब्दुल रेहमान, धमेंद्र प्रमल अहिरे, मुक्तार नबाब बागवान, शफीलाल मोहम्मद, आसिफ शाह लुकमान शाह फकिर, शाकीर हुसैन बागवान, रऊफ शेख मुसा मिस्तरी, कृष्णा आप्पा पेंढारकर, फरीद गुलाब बागवान, सलीम रफिक शाह, शुभम वामन जाधव, सुनिल भिमराव साळवे, पापा उर्फ मुस्तकीन राजू शाह, शाहरूख राजू शाह, ईस्माईल शाह शकुर शाह फकिर, कलीमखान बलदारखान बेलदार, मुक्तार भिकन शाह सर्व रा.बागवान गल्ली व आंबेडकर चौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तीन अल्पवयीन संशयीत आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, शहर पोलीस निरिक्षक दीपक बुधवंत यांच्यासह वरिष्ठ अधिका:यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. याबाबत फौजदार आनंदा पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक बुधवंत करीत आहे.