सातपुडय़ाकडे धावणा:या शिवसैनिकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:53 AM2019-10-25T10:53:14+5:302019-10-25T10:53:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी ...

Running towards Satpudya: Shiv Sena's haremod | सातपुडय़ाकडे धावणा:या शिवसैनिकांचा हिरमोड

सातपुडय़ाकडे धावणा:या शिवसैनिकांचा हिरमोड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा - अक्राणी विधानसभा मतदार संघात मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यार्पयत शिवसेनेच्या उमेदवाराने काही मतांनी आघडी घेतली होती. शिवसेनेचा हा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यात एकच असल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यानी सातपुडय़ाकडे धाव घेतली होती. परंतु अखेरच्या टप्प्यातच पराभव झाल्याचे त्यांचा हिरमोड झाला.
सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकुवा मतदारसंघात कॉँग्रेस व शिवसेनेमार्फत विजय मिळविण्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्ष मतमोजणीतही तशी परिस्थिती दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेकडून आमशा पाडवी  हे एकमेव उमेदवार असल्याने या मतदार संघाची निवडणूक शिवसेनेसाठी मोठी उत्सुकतेची शिवाय प्रतिष्ठेचीही ठरत होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या नजरा लागून होत्या. 
पहिल्या टप्प्यापासून शेवटर्पयत कॉँग्रेस व शिवसेनेने आघाडी घेतली. त्यानुसार मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही पक्षांमार्फत जल्लोष करण्यात येत होता. काही टप्प्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरही शिवसेनेने काही कालावधीत आघाडीच घेत अखरेच्या दोन टप्प्यार्पयत शिवसेनाच आघाडीवर राहिल्यामुळे विजय निश्चित असल्याचे समजून जिल्हाभरातील शिवसैनिक गुलाल, फटाके व अन्य साहित्य घेऊन अक्कलकुवा व धडगावकडे निघाले होते. परंतु शेवटच्या दोन टप्प्यात तोरणमाळ व असली या गटाची मतमोजणी झाल्यास कॉँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी.पाडवी यांनी आघाडी घेत विजयही मिळवला. त्यामुळे सर्व साहित्यानिशी सातपुडय़ाकडे रवाना झालेले शिवसैनिक नाराज झाले होते. 
काही वर्षापासून सुरु असलेल्या शिवसैनिकांनी समाजहितासाठी घेतलेली मेहनत वाया गेल्यामुळे  पदाधिका:यांसह कार्यकत्र्यामध्ये हिरमोड झाल्याचे दिसून आले. 

मतमोजणीत शिवसेनेचे एकमेव उमेदवार आमशा पाडवी यांनी कमालीची आघाडी घेतली. त्यामुळे अतिदुर्गम भागातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकत्र्यामध्येही विजय निश्चित असल्याचे समजले. सेनेसाठी अनुकूल वातावरण दिसून आल्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश कार्यकर्ते त्या-त्या गावातील सर्वात उंच डोंगरांवर फटाक्यांसह पोहोचले. परंतु अखेरच्या टप्प्यातच शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास कॉँग्रेसने हिरावला. आपला उमेदवार पराभूत  झाल्यामुळे त्या शिवसैनिकांनी डोंगरांवर नेलेले फटाके न फोडताच शांततेत खाली उतरवले.
 

Web Title: Running towards Satpudya: Shiv Sena's haremod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.