चालत्या ट्रॉलामध्ये वीज प्रवाह उतरून चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:13 PM2018-09-16T21:13:00+5:302018-09-16T21:13:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतातून गेलेल्या रस्त्यावर उच्च दाबाच्या वीज वाहिनीशी ट्रॉलाचा संपर्क येवून ट्रॉलामध्ये करंट उतरल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता ब्राrाणपुरीनजीक घडली. दरम्यान, मागून येत असलेल्या ट्रकमध्येही करंट उतरले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला.
कोळदा-खेतिया महामार्गाचे काम सुरू आहे. याअंतर्गत लोणखेडा ते खेतिया दरम्यानचे काम प्रगतीपथावर आहे. ब्राम्हणपुरीनजीक वळण रस्ता शेतातून गेला आहे. या कच्च्या वळण रस्त्याच्या बाजुलाच उच्च दाबाची वीज वाहिनी गेली आहे. रविवारी सायंकाळी ट्रॉलाचा (क्रमांक डीएल 09- क्यू 9990) संपर्क वीज वाहिनीशी आला. त्यामुळे त्यात करंट उतरले. चालक प्रतापसिंग खाली उतरण्याच्या प्रय}ात भाजला जावून तो गंभीर जखमी झाला. या ट्रॉलामागेच दुसरा एक ट्रॉला (क्रमांक डीएन 09 पीए 9393) होता. त्यात देखील वीज प्रवाह उतरला. परंतु चालकाने प्रसंगावधान राखून खाली उडी घेतली त्यामुळे तो बचावला.
ब्राrाणपुरी ग्रामस्थांनी लागलीच धाव घेवून मदतकार्य केले. वीज वाहिनीचा पुरवठा खंडित केला. चालकाला शहादा रुग्णालयात दाखल करण्यात आले.