बिबटय़ाच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये धावपळ
By admin | Published: January 11, 2017 12:17 AM2017-01-11T00:17:43+5:302017-01-11T00:17:43+5:30
रांझणी परिसर : श्रीकृष्ण गोशाळेत सलग दोन दिवस घडले दर्शन
रांझणी : परिसरातील श्रीकृष्ण गोशाळा रांझणी ता़ तळोदा येथे गेल्या तीन दिवसांपासून बिबटय़ाचा मुक्त संचार असून बिबटय़ाला पाहिल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची चांगलीच धावपळ होत आह़े सलग बिबटय़ाचा वावर दिसून येत असल्याने चांगलीच घबराट निर्माण झाली आह़े
दुपारी ग्रामस्थांचा परिसरात वावर असल्याने घाबरुन बिबटय़ा बाहेर येत नाही़ मात्र सायंकाळी परिसरातील वाहतूक कमी झाल्यावर मात्र हा बिबटय़ा परिसरात मुक्त संचार करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े सायंकाळी अंधार झाल्यावर बिबटय़ा गोशाळेत उसाच्या शेतामधून आला़ परंतु गोशाळेला कुंपण असल्याने त्या जाळीत त्याचे पुढील दोन पाय अडकल़े जाळीतील पाय बाहेर काढण्यासाठी बिबटय़ाचे प्रयत्न सुरु झाल़े परंतु यातून सुटका होत नव्हती़ बिबटय़ा सुटकेसाठी प्रयत्न करीत होता, गुरगुरत होता़ गोशाळेजवळ कसला तरी आवाज येत असल्याचे या वेळी ग्रामस्थांच्या लक्षात आल़े अंधारात कोणीतरी गुरगुरत असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े परिसरात अंधार असल्याने बिबटय़ा दिसून आला नाही़ परंतु अंधारात काही तरी हालचाल होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनात आल़े त्यानंतर त्या ठिकाणी लाईट लावून पाहिले असता कुपनाच्या जाळीमध्ये बिबटय़ाचे पुढील दोन पाय अडकले असल्याचे गोशाळेतील स्वयंसेवक तसेच ग्रामस्थांना दिसून आल़े बिबटय़ाला बघताच क्षणी उपस्थितांनी मोठ-मोठय़ाने आरडा-ओरड सुरु केली़ भेदरलेल्या बिबटय़ाने ग्रामस्थांना पाहून जाळीतून सुटका करुन घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु व सुटका झाल्याबरोबर त्यांने पुन्हा शेताकडे धूम ठोकली़
दुस:या दिवशी पुन्हा घडलीे बिबटय़ाचे दर्शन
पहिल्या दिवशी बिबटय़ा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होत़े रात्रीच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठीही शेतकरी धजावत नव्हत़े बिबटा पुन्हा येईल काय या धास्तीने दिवसादेखील शेतात जाण्यास शेतकरी घाबरत होत़े सलग दुस:या दिवशीही बिबटा दिसून आल्याने नागरिकांमध्ये अधिक भीती वाढली़ सायंकाळी 7.30 वाजता गोशाळेच्याच परिसरात कांडय़ा वळवी हा शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी आला असता त्याला पुन्हा बिबटय़ाचे दर्शन झाल़े वळवी याला पाहूण बिबटय़ाने गुरगुरणे सुरू केल़े व त्याच्या दिशेन चाल करू लागला़ बिबटय़ा आपल्या अंगावर येत असल्याचे पाहून वळवी घाबरला व आपला जीव मुठीत घेऊन तो गोशाळेच्या दिशेने धावत आला़ बिबटय़ानेही गोशाळेर्पयत त्यांचा पाठलाग केला व नंतर तो पुन्हा शेतात निघून गेला़ कांडय़ा वळवी यांने आपबीती गोशाळेचे अध्यक्ष आनंदराव मराठे यांना सांगितली़ मराठे यांनी तत्काळ ही माहिती वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांना भ्रमणध्वनी करुन सांगितली़ त्यानंतर गोशाळेत वनविभागाचे कर्मचारी दाखल झाल़े गोशाळा परिसरात आऱबी़ वायकर, एस़आऱ देसले, भावना जाधव, जी़आऱ खोपे यांनी बिबटय़ाचा तपास करण्यासाठी परिसर पिंजून काढला़ परंतु बिबटय़ा दिसून आला नाही़ बिबटय़ा दिसला नसता तरी पुन्हा परिसरात येणार नाही का असा सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आह़े परिसरात वेगाने शेते कमी होत आहेत़ तसेच ऊस तोड मोठय़ा प्रमाणात सुरु असल्याने परिसरात ग्रामस्थांचा वावर वाढला आह़े त्यामुळे मोकाट प्राण्यांना आपला निवारा सोडून इतरत्र जावे लागत आह़े यामुळेच बिबटय़ादेखील गोशाळेकडे आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आह़े बिबटय़ा आढळल्याने शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जायला शेतकरी घाबरत आहेत़ बिबटय़ाला जोर्पयत जेरबंद करत नाही तोर्पयत परिसरात भयमुक्त संचार करता येणार नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े
(वार्ताहर)
गोशाळा परिसरात हायमस्ट लॅम्पची मागणी
4श्रीकृष्ण गोशाळा हे परिसरातील शेतकरी तसेच पहाटे, सायंकाळी व्यायामास येणा:यांसाठी मध्यवर्ती केंद्र बनले आह़े रात्रीच्या वेळी शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जातात व त्यानंतर गोशाळेतच बैठक मांडत असतात़ परंतु रात्रीच्या वेळी परिसरात एकही लाईट नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े
अंधाराचा फायदा घेत अनेक मोकाट प्राणी हे गोशाळा परिसरात येत असतात़ त्यामुळे ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन परिसरात वावर करावा लागत आह़े त्यामुळे हायमस्ट लॅम्प बसविण्याची मागणी होत आह़े
4परिसरात बिबटय़ा आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आह़े वनविभागाने तत्परता दाखवून लागलीच घटनास्थळ गाठले असले तरी बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात इतरही मोकाट जनावरांचा वावर वाढला आह़े त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आह़े वनविभागाने तात्पुरती कारवाई न करता यासाठी कायमचा उपाय करावा, मोकाट प्राण्यामुळे पिकांचेही नुकसान होत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आह़े