पाण्याच्या सिंचनासाठी मोड येथे ग्रामस्थांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:55 PM2018-05-20T12:55:13+5:302018-05-20T12:55:13+5:30
सांडपाणी साठवण खड्डयात : पाणीटंचाईचे संकट दुर करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणा:या मोड ता़ तळोदा येथील ग्रामस्थांनी शनिवारी आपल्या युक्तीला कृतीत आणल़े गावातील सांडपाणी गावाबाहेर केलेल्या खड्डयात जिरवण्यासाठीचे पहिले प्रात्याक्षिक शनिवारी करण्यात आल़े
निझरा नदी व निझरा नदीस मिळणा:या नाल्यांचे तसेच गावातील सांडपाणी जमिनीत जिरावे यासाठी मोड येथील ग्रामस्थांकडून गावाबाहेर एक मोठा खड्डा तयार करुन त्यात नाल्यांचा तसेच सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यात आला आह़े यामुळे गावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन संभाव्य पाणीटंचाईचा धोका टळणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े
शनिवारी या उपक्रमाचे प्रात्याक्षिक करण्यात आल़े या वेळी सरपंच जयसिंग माळी यांनी उपक्रमाची माहिती ग्रामस्थांनी दिली़ निझरा नदीवर पोकलॅन्डच्या सहाय्याने 15 खड्डे करण्यात आले आहेत़ यात निझरा नदी तसेच निझरा नदीला मिळणारे नाले, गावातील सांडपाणी आदी पाणी साठवण्यात येणार आह़े एकूण 15 खड्डयांमध्ये हे पाणी जिरवण्यात येणार आह़े पावसाळ्यातसुध्दा यात पाणी जिरणार असल्याने पाण्याचे मोठे सिंचन होणार असल्याचा दावा करण्यात येत आह़े या खड्डयांमध्ये एकूण 18 कोटी लीटर पाणी साचेल इतकी क्षमता आह़े खड्डे 12 मीटर रुंद, तर 30 मीटर लांब आहेत़ पावसाच्या पहिल्या टप्प्यात साधारणत 15 कोटी लीटर पाणी जमा होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़े या उपक्रमाची सुरुवात मोड येथे साधारण एका वर्षापासून करण्यात येत होती़
लोकसहभाग व लोकवर्गणीतून झालेल्या या कामात ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आह़े पाण्याची पातळी वाढल्यास परिसरात केळी, पपई, ऊस, कापूस, गहू, मिरची आदी बारमाही पिके चांगल्या पध्दतीने घेता येतील असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आह़े शासनाने मोड येथे जलयुक्त शिवार उपक्रम राबवूनगावातील ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले होत़े