एकमुखी दत्ताला 56 भोगचा नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:49 AM2020-12-26T11:49:00+5:302020-12-26T11:49:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. ...

Sacrifice of 56 bhogs to one-faced Datta | एकमुखी दत्ताला 56 भोगचा नैवेद्य

एकमुखी दत्ताला 56 भोगचा नैवेद्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा :  देशभरात प्रसिद्ध असलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार    आहे. गीता जयंतीनिमित्त पूजाविधी करुन या यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. शुक्रवारी साध्या पद्धतीने  गीता जयंती साजरी करण्यात आली.
            शहादा तालुक्यातील  सारंगखेडा यात्रोत्सव यंदा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर रद्द केला असला  तरी दत्त मंदिर संस्थांनतर्फे प्रशासनाच्या नियमावलीचे  पालन करीत  मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
        शुक्रवारी सकाळी सात वाजता प्रथम मंदिरातील गाभाऱ्यातील  महानुभावपंथीय भाविकांनी दत्तप्रभूंच्या मूर्तीला स्नान घालत  ५६ प्रकारची मिठाई, फळे व अन्नपदार्थांचा उपहार  दाखवण्यात आला व विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.
दत्तजयंतीच्या आधीच  भाविकांना दर्शनाची ओढ
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव नसला तरी दत्तजयंतीच्या आधीच टप्प्या टप्प्याने शासनाच्या नियमांचे पालन करीत भाविक गीता जयंतीपासूनच येण्यास प्रारंभ झाला आहे. अनेक भाविक हे दत्त जयंतीच्या दिवशी नवस फेडण्यासाठी गर्दी करतात. मात्र गर्दी वाढू नये म्हणून सतर्कता दाखवीत शुक्रवारी नवस फेडण्यास प्रारंभ झाला.  त्यात तुलेचे नवस तसेच दालबाटीचा उपहार दाखवून नवस फेडला, अशी माहिती दत्त मंदिर संस्थानचे सचिव भिकन पाटील, चेअरमन   अर्जुन पाटील, व्हा.चेअरमन रवींद्र पाटील यांनी दिल.
साखरेची तुला
सारंगखेडा येथील एका महिलेला दुर्धर आजार झाला होता. या महिलेवर पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सहा महिन्यांनी प्रकृती चांगली झाली.  दरम्यान, महिलेच्या कुटुंबीयांची दत्तप्रभूंवर श्रद्धा असल्याने त्यांनी नवस मानला होता. शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी या महिलेची साखरेची तुला करून नवस फेडला. या वेळी त्यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

अश्वशौकिनांसह व्यापाऱ्यांची झाली निराशा
सुमारे ४००वर्षांची परंपरा असलेल्या महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या  व एक महिनाभर चालणाऱ्या दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या घोडे बाजारात व  चेतक महोत्सवात देशभरातून विविध जातीचे घोडे दाखल होतात. या घोडेबाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन शेकडो लोकांना त्या काळात रोजगार उपलब्ध होतो. चेतक महोत्सवात विविध प्रकारच्या अश्व स्पर्धा, महिलांसाठी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यात ग्रामीण भागासह शहरी भागातील कलाकारांना कला सादर करण्यासाठी त्यांना संधी प्राप्त होते.  परंतु कोरोनामुळे यंदा प्रशासनाने यात्रोत्सव रद्द केल्यामुळे अश्वशौकिनांचा व व्यापाऱ्यांची निराशा झाली आहे.

 

Web Title: Sacrifice of 56 bhogs to one-faced Datta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.