तळोद्यात मसाले विक्रीतून होतेय मोठी उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:44 PM2018-04-22T12:44:32+5:302018-04-22T12:44:32+5:30
कालिका माता यात्रोत्सव : गृहिणींकडून होतेय मोठी गर्दी
लोकमत ऑनलाईन
तळोदा, दि़22 : येथील कालिका देवीच्या यात्रेस अक्षय्यतृतीयेपाून सुरुवात झाली आह़े दिवसेंदिवस यात्रेकरुंकडून विविध जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आह़े मसाल्याच्या पदाथ्र्याचा खरेदी-विक्री व्यवहारसुध्दा मोठय़ा प्रमाणात होत आह़े
यात्रेत गृहिणी वर्षभरासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थ खरेदी करीत असतात़ यात्रेत आठ दिवस आधी मसाल्याची दुकाने लागतात़ व यात्रा संपल्यानंतरही आठ दिवसार्पयत मसाल्याची खरेदी-विक्री सुरुच असत़े या यात्रेतील मसाल्याच्या पदार्थाना मोठी मागणी असत़े आजच्या काळात मसाला उत्पादने व विक्रीच्या क्षेत्रात अनेक मोठमोठय़ा कंपन्या उतरल्या आहेत़ आकर्षक पॅकिंग असलेल्या पाकीटातून धने, जिरे, हळद , तिखट, राई तसेच इतर मसाल्यांची विक्री होत असत़े परंतु तरीदेखील येथील मसाल्यांना मोठी मागणी आह़े येथील मसाले घेऊन गृहिणी त्याचे दळण करुन वर्षभर वापरत असतात़ आजच्या काळातही स्वता जाऊन आवडीचा मसाला खरेदी करण्याकडे गृहिणींचा कल आह़े दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 8 ते 10 व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत़ या वर्षी यात्रेला मसाले बाजारात 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविण्यात ेयेत आह़े गेल्या काही दिवसांपासून मसाल्याच्या पदार्थाचे भाव गगनाला भिडले आहेत़ चांगल्या प्रतिचे जिरे 200 रुपये किलो, धने 80 ते 120, हळद पावडर 120 ते 140 रुपये, लाल तिखट मिरची 120 ते 160 रुपये, रसगुल्ला मिरची 200 रुपये तर चपाटा मिरची 150 रुपयाने विक्री होत आह़े