दोनच महिन्यात बाजारात 39 हजार क्विंटल मिरची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:03 AM2018-10-31T11:03:50+5:302018-10-31T11:03:56+5:30
रेड चिली फिव्हर : दोन वर्षातील विक्रमी उलाढाल
नंदुरबार : बाजार समितीत दोन महिन्याच्या कालावधीत 39 हजार क्विंटल मिरची आवक झाली आह़े विक्रमी अशा या आवकमुळे बाजार समितीसह व्यापारी, किरकोळ व्यापारी, आडतदार आणि मजूर यांच्यात उत्साह संचारला असून शेतक:यांना दुष्काळात दिलासा मिळाला आह़े
लाल मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मिरचीची आवक कमी झाली होती़ मिरची लागवडीत आलेली घट, पडलेले दर, मिरची सुकवण्यासाठी जागेची कमतरता आणि परप्रांतीय व्यापा:यांकडून जिल्ह्यातील मिरची पळवून नेण्याच्या प्रकारांमुळे मिरची उद्योग संकटात सापडला होता़ यंदा मात्र या उद्योगाला पुन्हा झळाळी आली आह़े 1 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर या दोनच महिन्याच्या हंगामात 38 हजार 975 क्विंटल मिरचीची आवक झाली होती़ ही आवक आणखी वाढणार असल्याने पाच वर्षाच्या खंडानंतर मिरची 70 हजार क्विंटलचा आकडा पार करणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े बाजारात मिरची आणणा:या शेतक:यांना गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत चांगले दर मिळाल्याने शेतक:यांमध्ये उत्साह आह़े आजघडीस ओल्या लाल मिरचीला 1 हजार 945 ते 3 हजार 500 तर कोरडय़ा मिरचीला 5 हजार 600 ते 8 हजार रूपये प्रतिक्विंटल दर आहेत़ गेल्या वर्षाच्या हंगामात लाल ओल्या मिरचीला 1 हजार 600 रूपयांर्प्यत दर होत़े यंदा दरवाढ झाल्याने नंदुरबार, शहादा तालुक्यांसह लगतच्या गुजरात राज्यातील शेतकरी दर दिवशी बाजारात मिरची आणत आहेत़ नंदुरबार बाजार समितीत मिरची खरेदी करणारे 22 व्यापारी असून अद्याप मध्यप्रदेश आणि इतर राज्यातील शेतक:यांकडून मिरची विक्रीसाठी आणणे शिल्लक आह़े ही मिरची दिवाळीत दाखल होणार असल्याने यंदा व्यापा:यांची दिवाळी होणार आह़े 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2017 या काळात केवळ 6 हजार 886 क्विंटल मिरची आवक झाली होती़ या मिरचीचा सर्वसाधारण दर हा 1 हजार 629 रूपये होता़ या आवकच्या दहापट मिरची आवक झाली असून यंदाच्या वर्षात या दरांमध्ये सातत्याने वाढ झाल्याने शेतक:यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आह़े