बुरशीयुक्त शेवयांचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

By admin | Published: July 1, 2017 01:13 PM2017-07-01T13:13:27+5:302017-07-01T13:13:27+5:30

बालकल्याण विभागाची कारवाई : पोषण आहाराची पाकिटे गोळा करण्याचे काम सुरूच

The samples of fungicides are sent to the laboratory | बुरशीयुक्त शेवयांचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

बुरशीयुक्त शेवयांचे नमुने प्रयोगशाळेत रवाना

Next

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.1 -नवापूर आणि शहादा तालुक्यात अंगणवाडी केंद्रात लहान बालकांना पुरवण्यात आलेल्या शेवयांमध्ये बुरशी दिसून आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या़ यानंतर महिला व बालकल्याण विभागाने या शेवयांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करण्याकरिता पाठविले आहेत़ आठ दिवसात नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आह़े 
बोकळझर, ता़ नवापूर आणि मोहिदे, ता़ शहादा येथे अंगणवाडीत पोषण आहार म्हणून दिल्या जाणा:या शेवयांमध्ये बुरशी दिसून आली होती़ बुरशी लागण्याची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट नसली, तरी जिल्ह्यातील सर्व 12 प्रकल्पांतर्गत येणा:या अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार रद्दबातल करण्याऐवजी महिला व बालकल्याण विभागाने सेविकांना आदेश देऊन पोषण आहाराचे वाटप थांबवले आह़े प्रत्येक बालकाला आधीच दोन पाकिटे वाटप केलेल्या सेविकांना आदेश देत पूर्ण साठाच परत घेण्याची गरज असतानाही प्रशासन केवळ थांबवण्यावरच भर देत असल्याने दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये अद्यापही अनेक घरांमध्ये पोषण आहाराची पाकिटे पडून आहेत़ 
पोषण आहारासारख्या गंभीर विषयात तत्काळ कारवाई करून सर्व शेवया परत मागवण्याची गरज असतानाही केवळ सेविकांच्या घरात पोषण आहार गोळा करण्याच्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधी व पालकांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े संबंधित ठेकेदाराला पोषण आहाराचा ठेका हा विभागीय स्तरावरून देण्यात आला असल्याने त्याची कारवाई करण्याचे अधिकारही विभागीय आयुक्तांना असल्याची माहिती आह़े संबंधित विभागाकडून कागदोपत्री कारवाई करण्यात बुरशीयुक्त शेवया खाऊन एखादा विद्यार्थी पडल्यास त्याला जबाबदार कोण असा, प्रश्न जिल्ह्यातून उपस्थित करण्यात येत आह़े 

Web Title: The samples of fungicides are sent to the laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.