सातपुडय़ातील आदर्श पुनवर्सनाचा नमुना ‘लक्कडकोट रोपवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:55 PM2017-11-17T12:55:12+5:302017-11-17T12:55:23+5:30

20 वर्षात वनक्षेत्र बहरले : नवापूर तालुक्यात वनविभाग व वनव्यवस्थापन समितीचा प्रयत्न

Samudhpur's ideal rehabilitation model 'Lankkot Ropavan' | सातपुडय़ातील आदर्श पुनवर्सनाचा नमुना ‘लक्कडकोट रोपवन’

सातपुडय़ातील आदर्श पुनवर्सनाचा नमुना ‘लक्कडकोट रोपवन’

Next
षण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ातील जंगल पाण्याखाली गेल्याने त्याचे पुनवर्सन कसे करावे, यावर विचार करत शासनाने नंदुरबार जिल्ह्यात रोपवनांची लागवड करून वनांचे पुनवर्सन केले होत़े गेल्या 20 वर्षात या वनांनी युवावस्थेत पदार्पण केले असून यातील लक्कडकोट रोपवन आदर्श पुनवर्सनाचा नमुना ठरत आह़े बुधवारी नर्मदा प्राधिकरण नदी विकास आणि गंगा पुर्नभरण जलस्त्रोत मंत्रालयाचे डॉ़ अफरोज अहमद यांनी लक्कडकोट येथे भेट देत वनव्यवस्थापन समितीच्या कार्याचा गौरव केला होता़ यावेळी त्यांनी वनविभागाच्या प्रय}ांचे कौतुक करून केंद्र सरकारकडून प्रकाशित होणा:या पुस्तीकेत लक्कटकोट रोपवनाचा समावेश करण्याची घोषणा केल्याने हे रोपवन प्रकाश झोतात आले होत़े गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर फुलवलेल्या या रोपवनात सहा लाखांपेक्षा अधिक झाडे असून गत 20 वर्षात या वनाचा विस्तार हा वाढत गेला आह़े एक परिपूर्ण वनक्षेत्र तयार होत असल्याने याठिकाणी बिबटय़ा आणि इतर वन्यप्राणीही या ठिकाणी आसरा घेत असल्याने वनविभागाने लावलेल्या कॅमे:यांमध्ये दिसून येऊ लागले आह़े या रोपवनातून औषधी वनस्पतीची निर्मिती व वनपर्यटनासाठी क्षेत्र खुले करण्याचा प्रस्ताव वनविभागाच्या विचाराधिन आह़े 60 हेक्टरवर झाडांचे संगोपन 1990 साली सरदार सरोवर पुनवर्सन विभागाने नवापूर तालुक्यातील लक्कडकोट येथे 60 हेक्टर जागा वनविभागाला देण्यात आली होती़ या जागेवर लक्कडकोट वनव्यवस्थान समिती आणि वनविभाग यांच्या संयु्क्त विद्यमाने दरवर्षी झाडांची लागवड करण्यात येत होती़ वर्षभर याठिकाणी झाडांची राखण करून चराईबंदी आणि कु:हाडबंदी करण्याचा निर्णय वनव्यवस्थापन समितीने घेतला होता़ त्यानुसार त्यांच्याकडून गेल्या 20 वर्षापासून कार्य सुरू आह़े या रोपवनात खैर, साग, अजरुन, पिंपळ, उंबर, शिसे, निम, चिंच यासह किमान 150 प्रजातींची विविध झाडे आणि शेकडो प्रकारच्या आयुव्रेदिक वनस्पतींचे संगोपन करण्यात आले आह़े याठिकाणी निर्माण होणारे गवत हे वनसमितीला देण्यात येत़े वनांचे सरंक्षण करणा:या समितीला बांबूची कमाई होत आह़े रोपवनामध्ये गेल्या 20 वर्षात मृदसंधारणाची कामे याठिकाणी झाल्याने पाण्याची पातळी वाढवण्यात यश आले आह़े60 हेक्टरमध्ये विस्तीर्ण पसरलेल्या या रोपवनाच्या परिसरात पाण्याची मुबलक उपलब्ध निर्माण केली गेल्याने झाडांचे संगोपन चांगल्या प्रकारे होत आह़े विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात तब्बल सहा लाख झाडांचे टप्प्याटप्प्याने रोपण करण्यात येत आह़े समिती आणि वनविभाग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या प्रयत्नामुळे लक्कडकोट आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी गेल्या 10 वर्षात तसूभरही कमी झालेली नाही़ याठिकाणी मजूरांना रोहयोच्या माध्यमातून बाराही महिने कामे देण्यात येत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न सुटला आह़े

Web Title: Samudhpur's ideal rehabilitation model 'Lankkot Ropavan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.